Sa Saam TV
मुंबई/पुणे

तुमची मुलं स्टडीत, आमची कस्टडीत का? राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडचा सवाल

'धर्माचे राजकारण बंद करा, राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे स्वतः 'भोंगे' बंद करायला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का?'

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : धर्माचे राजकारण बंद करा, राज ठाकरेंचा (Raj Thackeray) मुलगा अमित ठाकरे स्वतः 'भोंगे' बंद करायला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का? तुमची मुलं स्टडीत, आमची मुलं कस्टडीत का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) उपस्थित केला आहे.

विनाकारण मुलांची डोकी भडकवायची, आजपर्यंत अशीच चिथावणीखोर भाषण केली आणि दंगली झाल्या या दंगलींमध्ये शेकडो मुलांवर गुन्हे दाखल झाले त्यांना सोडवायला कोणी आलं नाही. काल पर्यंत गुण्यागोविंदाने राहणारी लोकं आज एकमेकांना मारायला उढतात, किती दिवस लोकांना असं भडकवणार आहात.

दुकान बंद पडलय म्हणून असले भडक मुद्दे बाहेर काढतात, मात्र यांच्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यपाल कोणतीही कारवाई करत नाहीत, हे सरकारचे जावई आहेत का? असा संतप्त सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सरकारला केला आहे.

विनाकारण विद्वेशाचं राजकारण कोणीही करु नये. राज ठाकरे आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यापासून सावध रहा असंही ते म्हणाले आहेत. दुसऱ्यांचीच घरं किती दिवस जाळणार. किती दिवस आमची पोरं आणि त्यांची डोके भडकवणार, घाणेरडे राजकारण थांबवा, आम्हाला दंगली, वाद नको आहेत असं म्हणतचं धर्माचे राजकारण बंद करा, राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे स्वतः 'भोंगे' बंद करायला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का? तुमची मुलं स्टडीत, आमची मुलं कस्टडीत का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडनकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT