Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे शक्तिप्रदर्शन करत असताना आलेला तो फोन कोणाचा?

शक्तिप्रदर्शन करत असतानाच शिंदे यांना एक फोन आला होता. तो फोन कोणाचा आहे याबाबत आता तर्क वितर्क लढविले जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना नेते (Shivsena) आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेलं बंड दिवसेंदिवस उद्धव ठाकरेंसाठी मोठं अडचणीचम ठरतं आहे. कारण, शिंदे यांच्या गोटात सामिल होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे.

अशातच आता एकनाथ शिंदे गुवाहाटीमधील ज्या 'रेडिसन ब्लु' हॉटेमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलमध्ये आमदारांचा आकडा जवळपास ४५ च्या वरती पोहचल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीतील हॉटेलमध्ये उपस्थित असल्याची माहीत समोर येत आहे.

पाहा व्हिडीओ -

अशातच आज शिंदे, शिवसेना मंत्री आणि आमदार याचा त्या हॉटेलमधून एक व्हिडीओ आता व्हायरल (Viral Video) होत असून या व्हिडीओद्वारे शिंदे गट शक्तिप्रदर्शन करत असल्याचं त्यातून दिसून येत आहे. मात्र, हे शक्तिप्रदर्शन करत असतानाच शिंदे यांना एक फोन आला तो व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे शिंदे हे आमदारांसोबत फोटो काढत असताना त्यांना आलेला तो फोन कोणाचा? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

कारण शिंदे यांनी शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडत महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिल्यामुळे सरकारचा धोका वाढत आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. सत्तेची समीकरण जुळविण्यासाठीची ही धावाधाव असल्याचं बोललं जात आहे. शिवाय सध्याच्या घडीला प्रत्येक आमदारावर सर्व पक्ष लक्ष ठेवून आहेत. काही आमदारांना फोन वापरायची देखील मुभा नाहीये यावरुन सध्याचं वातावरण लक्षात येत आहे.

कारण शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या गटाला भाजपकडून मोठी ऑफर मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदे, तर केंद्रात २ मंत्रिपदे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून (BJP) ही ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन कोणाचा कोणी आणखी आमदार त्यांना येऊन भेटणार आहे त्यांचा की भाजपचा का वाटाघाटीसाठी तो फोन मातोश्रीवरुन गेला आहे. अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह! भाजपने केसानं गळा कापला, शिंदेसेनेच्या आमदाराचा आरोप

Homemade Skin Tan Removal Tips: उन्हामुळे त्वचा काळी पडलीये? पार्लरला जाण्यापूर्वी 'हे' ५ घरगुती उपाय करा; चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Face Care: उन्हामुळे त्वचेची डल पडली आहे? घरी तयार केलेला हा फेस स्क्रब आठवड्यातून ३ वेळा नक्की वापरा

प्रशासनात मोठा उलटफेर होणार; 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीची शक्यता, थेट दिल्लीत पोहोचली चर्चा

SCROLL FOR NEXT