Daund News Saam Tv
मुंबई/पुणे

Daund Mass Death News : एकाच कुटुंबातील ७ जणांना कुणी आणि का संपवलं? हत्येचं कारण आलं समोर

या सर्वांची आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yavat News : पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात काल एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. भीमा नदीत पात्रात सात जणांचे मृतदेह आढळले होते त्यानंतर या सर्वांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या सर्वांची आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बुधवारी भीमा नदीपात्रात एक खळबळजनक घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह नदीपात्रात आढळले. यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व जण उस्मानाबाद (Osmanabad) आणि बीड (Beed) जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आलीय. कुणीतरी या सातही जणांची हत्या केली असावी, अशी शंका आता उपस्थित होतेय. मोहन पवार, संगिता पवार, शाम फुलवरे, राणी फुलवरे, रितोश भैय्या, छोटू, कृष्णा अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावं आहे.

हत्येचं कारण

या संपूर्ण प्रकरणी अधिक तपासासाठी पोलिसांनी एकूण पाच पथकं तैनात केली आहे. संशयितांपर्यंत पोहोचण्यातही पोलसांना यश आलंय. अनैतिक संबंधाचा राग मनात धरुन हे हत्याकांड घडलं असावं, अशी शंका घेतली जात आहे.

जुन्या रागातून हे हत्याकांड घडल्याचं आधी सांगितलं जात होतं. पण आता अनैतिक संबंधाचा राग मनात धरून हे कृत्य केलाची माहिती मिळत आहे. याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल हे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Right Time For Walking: सकाळी की संध्याकाळी? वजन कमी करण्यासाठी नक्की कोणती वेळ चालणे जास्त फायदेशीर

Political News : लिंबू कापला पाऊस थांबवला! भाजप खासदाराचा भर कार्यक्रमात अजब दावा

Maharashtra News Live Update: मंत्री पंकजा मुंडे , आदिती तटकरे यांनी आ.धनंजय मुंडेना बांधली राखी

Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी लॉटरी! थेट ₹१४,००० ने स्वस्त होणार सोनं? केंद्र सरकारच्या एका निर्णयाने उडाली खळबळ

Kapuskonda Movie: सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले पुन्हा आमनेसामने; 'कापूसकोंडा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT