भाजपचे आमदार सुनील कांबळे सध्या चांगलेच चर्चेत आलेत. 5 जानेवारी रोजी त्यांच्याकडून घडलेल्या कृतीमुळे त्यांची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार सुनील कांबळे यांच्याकडून एकाच दिवशी दोन धक्कादायक प्रकार घडलेत. सुनील कांबळे यांनी शुक्रवारच्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. तर दुपारी एका पोलिसाच्या कानशिलातही लगावली. त्यांच्या या धक्कादायक कृतीमुळे ते चांगलेच चर्चेत आलेत. (Latest Marathi News)
भाजपचे आमदार सुनील कांबळे सध्या चांगलेच चर्चेत आलेत. 5 जानेवारी रोजी त्यांच्याकडून घडलेल्या कृतीमुळे त्यांची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार सुनील कांबळे यांच्याकडून एकाच दिवशी दोन धक्कादायक प्रकार घडलेत.
सुनील कांबळे यांनी शुक्रवारच्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. तर दुपारी एका पोलिसाच्या कानशिलातही लगावली. त्यांच्या या धक्कादायक कृतीमुळे ते चांगलेच चर्चेत आलेत. यासंदर्भात त्यांना प्रश्न केला असता त्यांनी मारहाण केल्याचं कृत्य फेटाळून लावलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सुनील ज्ञानदेव कांबळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. 10 सप्टेंबर 1968 रोजी त्यांचा पुण्यात जन्म झाला आहे. 2019 मध्ये कांबळे पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे लढले.
कांबळे हे पुणे कॅन्टोन्मेंटमधून महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभेवर निवडून आले. पुणे कॅन्टोन्मेंट हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदार संघ आहे. आमदारकी लढवण्याची ही त्यांची पहिलीच टर्म आहे. याआधी त्यांचे भाऊ दिलीप कांबळे हे या मतदारसंघातून भाजपचे आमदार होते.
दिलीप कांबळे हे माजी राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत.1992 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक होते. ABVP मध्ये एक तरुण कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात केली.
पश्चिम बंगाल 2021 च्या निवडणुकीत बालूरघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचार आणि बूथ स्तरावर संपर्क साधण्यात त्यांनी भाजपच्या बाजूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सुनील कांबळे हे पुणे महापालिकेत भाजपकडून अनेक वर्ष नगरसेवक राहिले आहेत.
सुनील कांबळे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते. सुनिल कांबळे यांच्यावर 2010 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. सुनील कांबळे यांच्यावर पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला दमदाटी तसंच शिवीगाळ केल्याचाही आरोप झालेला आहे. त्या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दरम्यान, सध्या ते मारहाणीच्या दोन कृतींमुळे चांगेलच चर्चेत आले आहेत
5 जानेवारी रोजी आमदार सुनील कांबळे यांच्या संदर्भातील दोन धक्कादायक बातम्या समोर आल्या. त्यांच्या या धक्कादायक कृतीमुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ससून रुग्णालयात शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उद्घाटनाच्या पाटीवर आमदार सुनील कांबळे यांचे नाव न टाकल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, आमदार सुनील कांबळे यांनी याच कार्यक्रमात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या देखील कानशिलात लगावली आहे. विशेष बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच हा प्रकार घडला आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरताना कांबळे यांनी त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शिवाजी सरक यांच्या कानशिलात लगावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.