Sanjay Raut Shivsena Latest News
Sanjay Raut Shivsena Latest News ANI
मुंबई/पुणे

शिवसेना कुणाची? EC च्या नोटिशीवर राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये, निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना शिवसेनेवर अधिकार असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या या नोटिशीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Shivsena Latest News)

महाराष्ट्रातील जनतेसाठी हे धक्कादायक असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर, निवडणूक आयोगाच्या या कृतीवर संजय राऊतांनी संतापही व्यक्त केला आहे. शिवसेना आमची आहे, याचे पुरावे कसले मागता?, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार करून ५६ वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली होती आणि आज निवडणूक आयोग त्यांच्या संघटनेवर प्रश्नचिन्ह लावत आहे. संजय राऊत यांनी यावेळी केंद्र सरकारवर सुद्धा निशाणा साधला. दिल्लीला आमचा पक्ष उद्ध्वस्त करायचा आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut Latest News)

त्याचबरोबर आजच्या काळात फक्त उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव नेते आहेत, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस पाठवून पक्षावरील अधिकार सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

यासंदर्भात आयोगाच्या वतीने दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याआधी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून धनुष्यबाणावर आपलाच अधिकार आहे असा दावा केला होता.

एकनाथ शिंदे यांच्या पत्रात, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या मान्यतेचा हवाला होता. दरम्यान, हाच हवाला देत शिंदे गटाने स्वतःलाच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha News : 1 मिनिट बाकी असताना उमेदवारी अर्ज मागे घेतला! अनिल जाधवांच्या माघारीनं कुणाला दिलासा?

Honeymoon Dress Ideas: हनिमूनसाठी हटके ड्रेस आयडिया

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटला

Gadchiroli News Today: नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळला! कुकरमध्ये लपवली होती स्फोटकं

Nashik Loksabha: फक्त १ मिनीट बाकी अन् अखेरच्या क्षणी माघार... बंडखोर अनिल जाधवांमुळे नेते कार्यकर्त्यांची पळापळ; नाशिकमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT