Who is Bhushan Gagrani: Saam Tv
मुंबई/पुणे

Who is Bhushan Gagrani: कोण आहेत बीएमसीचे नवे आयुक्त भूषण गगराणी

Bharat Jadhav

Brihanmumbai Municipal Corporation New Bhushan Gagrani :

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांच्या नियुक्ती करण्यात आलीय. ज्या सनदी अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय, त्यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने मंगळवारी आयोगाकडे आयुक्तपदासाठी तीन नावांचे पर्याय पाठवले होते. सरकारने पाठवलेल्या तीन नावांपैकी केंद्रीय निवडणूक आयोगाने भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.(Latest News)

केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हटवल्यानंतर आयुक्तपदासाठी तीन सनदी अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. यात भूषण गगराणी महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी व बेस्टचे अनिल डिग्गीकर यांच्या नावांचा समावेश होता.

कोण आहेत भूषण गगराणी

भूषण गगराणी हे सर्वात श्रीमंत आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. गगराणी यांनी सरकारला दिलेल्या मामलत्ता विवरण पत्रात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत २, नवी मुंबईत १ सदनिका. मुंबईत १ गाळा. ४ भूखंड व कोल्हापुरात वडिलोपार्जित घर असल्याचं सांगितलंय.

गगराणी हे ११९० केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये २०२२ ला त्यांची अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवड झाली होती. गगराणी यांनी विविध महत्त्वाच्या विभागांत कामगिरी केलीय. ते शहरी विकास, मराठी भाषा आणि जलसंपदा या क्षेत्रांतही त्यांनी काम केलं आहे. गगराणी यापूर्वी उद्योग, सार्वजनिक आरोग्य, एमआयडीसी, राज्य पर्यटन विकास महामंडळ, सिडको, एमएसआरडीसी या विभागांमध्ये काम केले आहे.

ठाणे महापालिका आयुक्तपदाची धुरा सौरभ राव यांच्यावर तर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची जबाबदारी कैलास शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय. भूषण गगराणी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी, सौरभ राव यांना ठाणे महापालिका आयुक्तपदी आणि कैलाश शिंदे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT