Ambernath : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Ambernath : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग

एमआयडीसी अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत ट्रान्सफॉर्मरला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसी परिसरात क्रेमॉइंट नावाची कंपनी असून, या कंपनीच्या बाजूला विद्युत विभागाचा ट्रान्सफॉर्मर आहे.

हे देखील पहा-

या ट्रान्सफॉर्मरला रात्री ११.३० सुमारास अचानक मोठी आग लागली आहे. सोबतच ट्रान्सफॉर्मरमध्ये एक स्फोट सुद्धा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग पूर्णपणे विझवली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहेत. आग विझवल्यानंतर ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली असता. ही आग ट्रान्स्फॉर्मर मधील ऑईल चोरताना लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ट्रान्सफॉर्मरच्या खालच्या बाजूला ऑईल चोरण्यासाठी प्लास्टिकचे पाईप बसवण्यात आले होते. तसेच ट्रान्सफॉर्मर पासून काही अंतरापर्यंत काही प्लास्टिकचे पाईप टाकून, त्याद्वारे ही चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी ही आग लागली. त्यावेळी ऑईल चोरी करणारे, चोरटे ट्रान्सफॉर्मर जवळच उभे होते. मात्र, आग लागताच हे चोरटे तिथून पळून गेले आहेत. अशी माहिती काही प्रत्यक्ष दर्शींनी दिली आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

SCROLL FOR NEXT