E - Sakal No 1 In Comscore Among All Marathi News Website Saam Tv
मुंबई/पुणे

E - Sakal No 1 : डिजिटल विश्वात ई-सकाळची पुन्हा कमाल; नव्या वर्षांत सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर

E - Sakal No 1 In Comscore Among All Marathi News Website : ई-सकाळने कॉमस्कोर रेटिंगमध्ये मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ६१ मिलियन युजर्ससह डिजिटल माध्यमांमध्ये ई-सकाळचा दबदबा कायम आहे.

Alisha Khedekar

  • ई-सकाळ मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये नंबर १ ठरली

  • ६१ मिलियन युजर्ससह विक्रमात्मक वाढ

  • वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांमुळे यश

  • मल्टिमीडिया कंटेंटमुळे वाचकांचा वाढता प्रतिसाद

सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. या युगात डिजिटल पत्रकारिता देखील जोमाने सुरु आहे. यामध्ये ई- सकाळ ही वेबसाईट वाचकांना नेहमीच ताज्या घडामोडींची वेळोवेळी माहिती देत असते. याच जोरावर पत्रकारिता क्षेत्रात डिजिटल प्लॅटफॉर्मवर ई- सकाळने मोठी बाजी मारली आहे. २०२६ या नव्या वर्षात सलग तिसऱ्यांदा ई- सकाळ ही नंबर १ वेबसाईट ठरली असून कॉमस्कोरच्या ताज्या रेटिंगनुसार ई-सकाळने मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये नंबर पहिले स्थान पटकावले आहे

हे फक्त यश नसून मराठी वाचकांच्या वाढत्या विश्वासाची आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेची पोच पावती आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. खेड्यापाड्यांपासून ते शहरी भागातील वाचकांपर्यंत सर्व स्तरांतील प्रेक्षकांनी ई-सकाळला दिलेल्या पसंतीमुळे हे यश शक्य झाले आहे. डिजिटल माध्यमांमध्ये सगळ्यात वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्यावर ई-सकाळने कायम भर दिला आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहून वाचकांच्या अपेक्षा ओळखत ई-सकाळ नेहमीच वेगवेगळी माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. त्यामुळेच ई-सकाळने डिजिटल न्यूज क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाचकसंख्या मिळवत मराठी न्यूज प्लॅटफॉर्ममध्ये आपला विजयाचा पाया भक्कम रोवला आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ई-सकाळ वेबसाइटला तब्बल ६१.१ मिलियन युजर्सनी भेट दिली असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मानला जात आहे.

स्थानिक स्तरापासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींना व्यापक कव्हरेज देण्यासोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेला मल्टिमीडिया कंटेंटही वाचकांना आकर्षित करत आहे. वेब स्टोरीज, व्हिडिओ न्यूज, फोटो गॅलरी आणि स्पष्टीकरणात्मक लेख अशा विविध फॉरमॅट्समुळे वाचकांना अधिक समृद्ध आणि आकर्षक अनुभव मिळत आहे. भविष्यातही अचूक माहिती आणि विश्वासार्हतेने ई-सकाळ डिजिटल माध्यमांमध्ये नवे उच्चांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon: हॉटेलच्या मागे शेतात अश्लिल कृत्य, पोलिसांनी धाड टाकली; १३ पुरुष अन् १० महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं

Dilip Gavit: पाच वर्षांचा असताना हात गमावला; नाशिकच्या पोरानं जिद्दीनं सुवर्णपदक कमावलं

बापरे! एक महिना मीठ खाल्लंच नाही तर...

Maharashtra News Live Update: नाशिक महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरांनी केली खड्डेमय रस्त्यांची पाहणी

Tamilnadu Government: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी, 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT