Maharashtra Election Commission on Ladki Bahin Yojana Saam Tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana: आचारसंहिता लागू झाल्यावर निधी दिला का? आम्ही तपास करू; लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचं मोठं वक्तव्य

Satish Kengar

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात खूपच गाजत आहे. सरकारच्या या योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्य सरकारने दिवाळीआधीच लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे (३००० रुपये) एकत्र दिले आहेत. यावरच आता राज्य निवडणूक आयोगाने मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''आचारसंहिता लागू झाल्यावर योजना राबविण्यात आली का? निधी देण्यात आला का ? यावर आम्ही तपास करु.''

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''विधानसभा २८८ जागांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली. लोकसभेच्या १६ - नांदेड या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येईल. आचारसंहिता चालू झाली असून त्यानुसार सर्व पक्षांची बैठक घेण्यात आली आहे.''

आचारसंहिताबद्दल बोलताना चोक्कलिंगम म्हणाले की, ''आचारसंहिता ही तारखांची घोषणा होते, तेव्हाच लागू होते. दुपारी ३.३० वाजताची पत्रकार परिषद होती, तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर कोणते जीआर अपलोड झाले, ते बघून त्यावर योग्य ती माहिती घेऊन प्रेस नोट काढू.''

ते पुढे म्हणाले की, ''निवडणुकीची तारीख ही सुट्टीच्या दिवशी आली की, नागरीक फिरायला जातात. त्याचा परिणाम मतदानावर होतो. त्यामुळे यावेळी वीक डेमध्ये निवडणुकीची तारीख काढण्यात आली. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : तिसरी आघाडी, काम बिघाडी; विधानसभा निवडणुकीत कोणाची मते खाणार? पाहा व्हिडिओ

India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट

VIP Security: राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह 9 नेत्यांच्या VIP सुरक्षेतून नसणार NSG कमांडो, कोण करणार नेत्यांची सुरक्षा?

Manoj Jarange - OBC : हिंमत असेल तर 288...; ओबीसी बांधवांचे मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज

Insurance: क्या बात, क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT