कोरोना काळातला सोनू सूद नावाचा मसीहा कुठे गायब झाला - शालिनी ठाकरेंचा सवाल Saam Tv News
मुंबई/पुणे

कोरोना काळातला सोनू सूद नावाचा मसीहा कुठे गायब झाला - शालिनी ठाकरेंचा सवाल

पूरग्रस्तांना महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ सुरु होता. मात्र बॉलिवुड जगत याबाबत उदासीन होते. सोनू सूद किंवा इतर कोणत्याही बड्या कलाकाराने पूरग्रस्तांना मदत केली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे (heavy rain in maharashtra)अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला होता. या पुरामुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण बेघर झाले. अशात राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, पोलिस, सैन्य, एनडीआरएफ आणि अनेक सेवाभावी संस्था बचावकार्य करत होते. पूरग्रस्तांना महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ सुरु होता. मात्र बॉलिवुड (bollywood) जगत याबाबत उदासीन होते. कोणत्याही बड्या कलाकाराने पूरग्रस्तांना मदत केली नाही. यावरुनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (shalini thackeray mns) यांनी बॉलिवुडवर निशाणा साधला आहे. यात त्यांनी बॉलिवुड अभिनेता सोनू सूदचा (sonu sood messiah) खास उल्लेख केला आहे. (where is messiah sonu sood asked shalini thackeray)

हे देखील पहा -

अभिनेता सोनू सूद याने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान परप्रांतीय मजुरांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी बरीच मदत केली होती. शेकडो बसेसची व्यवस्था करुन त्याने या मजुरांना अन्न, पाण्यासह सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवले होते. मात्र महाराष्ट्रात पूराने थैमान घातलेले असतेने सोनू सूदने कुठल्याही प्रकारची मदत या पुरग्रस्तांना केली नाही. त्यामुळेच संपूर्ण बॉलिवुडसह सोनू सूदवर शालिनी ठाकरेंनी टीका केली आहे.

आपल्या टि्वटमध्ये त्या म्हणाल्या की, कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..? असे ट्विट करत त्यांनी सोनू सूदलाही टॅग केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर (ameya khopkar) यांनीही अशाच प्रकारे पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन बॉलिवुडकरांना केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाड (mahad) येथे भेट देऊन पूरग्रस्त परिस्थीची पाहणी केली होती. मुख्यमंत्र्यांकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. या संकटाचा सामना करण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT