...जेंव्हा देवेंद्र फडणवीस स्मशानभूमीचे उद्घाटन करायला घाबरतात Saam TV
मुंबई/पुणे

...जेंव्हा देवेंद्र फडणवीस स्मशानभूमीचे उद्घाटन करायला घाबरतात

मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटते - देवेंद्र फडणवीस

दिलीप कांबळे

मावळ - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज लोणावळा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण केले. यावेळी लोणावळा येथे असलेल्या स्मशानभूमीचे देखील उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मधील स्मशानभूमीचा किस्सा सांगितला. मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटते.

हे देखील पहा -

नागपूरला महापौर असताना स्मशानभूमीच्या उद्घाटनाला मला बोलविण्यात आले होते. त्यावेळी एक डेड बॉडी आणून त्याला अग्नी माझ्या हस्ते देण्यात आली होता. त्यामुळे मला स्मशानभूमीचे उद्घाटन करायला भीती वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र लोणावळ्यात स्मशानभूमीचे उद्घाटन करताना असं काही केलं गेलं नाही. त्यामुळे बर वाटल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपण चालत आहे. त्यांचा प्रसार पुढे ही होत रहावं, म्हणून शासनाकडून त्यांचे खंड प्रकाशित केले जातात. अल्पदरात ती विक्री केली जायची. पण आता डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले सारख्या युगपुरुषांचे साहित्य प्रकाशन बंद केले आहे. त्यामुळेच न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. राज्य सरकार तकलादू कारणं देतं आहे. मी मागणी करतो, की त्यांच्या खंड प्रकाशन सुरू करावे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर ६ दिवस रस्त्यावर, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Bank Holiday in November : नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी...

PSI Gopal Badne: महिला डॉक्टरवर चारवेळा बलात्कार करणारा कोण आहे PSI गोपाल बदने? VIDEO

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पावसाचा हाहाकार

Sachin Sanghvi Arrested: २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला अटक

SCROLL FOR NEXT