manoj kotak criticizes aslam shaikh in mumbai saam tv
मुंबई/पुणे

Mumbai: शिवसेनेला 'याचा' विसर पडल्याची भाजप खासदाराने व्यक्त केली खंत

मुंबईतील क्रीडा संकूलास टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन वाद उफाळला आहे.

जयश्री मोरे

मुंबई : मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या याकूब मेमनला सोडविण्याची ज्याने मागणी केली त्या असलम शेख यांच्याकडून आणखी काय अपेक्षा असणार. त्यांच्याकडून मुंबईतील क्रीडा संकूलास (mumbai sports complex) टिपू सुलतानचे (tipu sultan) नाव देणे हे अपेक्षितच होतं असे भाजपचे खासदार मनाेज काेटक (manoj kotak) यांनी नमूद करीत शिवसेनेला याचा विसर पडल्याची खंत व्यक्त केली.

खासदार काेटक म्हणाले मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये असलेला आरोपी याकूब मेमन त्याला वाचविण्यासाठी असलम शेख (aslam shaikh) यांनी प्रयत्न केले. त्यांनाच आपल्या मंत्रिमंडळात मंत्री बनवलं. त्यांना मुंबईचे (mumbai) पालकमंत्री बनवलं.

महापौरांचा विरोध हा वायफळ आहे. जे मंत्री आता टिपू सुलतानची (tipu sultan) वकिली करत आहेत ते महाविकास आघाडी सरकार (mva) आल्यानंतर वकिली करत आहेत. हे मुंबईकर बघत आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवावं असेही खासदार मनोज कोटक यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल; आधी IPS मग IAS; कोणत्याही कोचिंगशिवाय दोनदा UPSC क्रॅक; कोमल पुनिया यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक; महापौर पदावर कोणाची वर्णी? सस्पेन्स कायम

'NCP विलिनीकरणाविरोधात कट कारस्थान?' वडेट्टीवारांच्या दाव्यानं राज्यात खळबळ

पाकचा टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; भारत-पाक क्रिकेट युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'

Child Missing: मुंबईत 36 तासांत 12 मुले बेपत्ता, मानवी तस्करी करणा-या टोळ्या सक्रिय?

SCROLL FOR NEXT