'सूर्यनमस्कार इस्लामला मान्य नाही'; मुस्लिम लाॅ बाेर्ड आक्रमक

खाेटे देश प्रेम दाखविणे साेडून द्या.
suryanamaskar
suryanamaskar

सातारा : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार (Surya Namaskar) घालण्याच्या उपक्रमास नुकताच प्रारंभ झाला आहे. या मोहिमेत जास्ती जास्ती विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. दरम्यान सूर्यनमस्कार ही सूर्याची उपासना (पूजा) असल्याने मुला-मुलींनी यामध्ये सहभागी हाेऊ नये असे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (All India Muslim Personal Law Board) मुस्लिम समुदयास केले आहे.

देशातील शाळांतमध्ये सात जानेवारीपर्यंत सूर्यनमस्कार (suryanamaskar) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश शासनाकडून शाळांना (school) प्राप्त झाले आहे. या उपक्रमात आत्तापर्यंत देशातील ३० राज्य सहभागी झाले आहेत. त्यातील सुमारे २१ हजार ८१४ संस्थांनी नाेंदणी केली असून सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

suryanamaskar
‘गर्व से कहो हम हिंदू है’: योगी आदित्यनाथ यांनी अमेठीत राहुल गांधींना फटकारले

दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम (muslim) पर्सनल लॉ बोर्डाने 'सूर्य नमस्कार' हा सूर्यपूजेचा एक प्रकार आहे आणि इस्लाम त्याला परवानगी देत नाही. त्यामुळे यामध्ये मुला-मुलींनी सहभागी हाेऊ नये असे समुदयास कळविले आहे. तसेच आम्ही सूर्याला देवता मानत नाही आणि त्याची उपासना देखील करीत नाही. खाेटे देश प्रेम दाखविणे साेडून द्या आणि निर्देश मागे घ्या असेही ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com