Ajit Pawar On Sharad Pawar Retirement
Ajit Pawar On Sharad Pawar Retirement Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar On Sharad Pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीनंतर पुढे काय?, अजित पवारांनी दिली सविस्तर माहिती

Priya More

Mumbai News: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या या भावनिक साथेनंतर शरद पवारांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 'कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता एक कमिटी स्थापन करुन पुढील निर्णय घेतला जाईल.', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवारांनी सांगितले की, 'तुमच्या भावना साहेबांना कळाल्या आहेत. साहेबांनी एक आवाहन केले आहे. पक्षाची कमिटी पुढचा निर्णय घेईल. ही कमिटी एकंदरीत लोकांचा आलेला कौल लक्षात घेईल. या कमिटीनेच पुढच्या गोष्टी ठरव्यात. ते जे ठरवतील ते साहेबांना मान्य आहे.'

अजित पवारांनी पुढे सांगितले की, कमिटी म्हणजे कुठली बाहेरची लोकं नाहीत. या कमिटीत राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातीलच लोकं असतील. मी असेल सुप्रिया असेल आणि इतर सर्वजण असतील.' तसंच, 'तुम्ही जी भावनिक साथ साहेबांना घातली आहे ती आमच्या सर्वांच्या लक्षात आली आहे. कमिटी तुमच्या मनातला योग्य निर्णय घेईल. ऐवढी खात्री मी तुम्हाला देतो.', असे अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितले.

'राष्ट्रवादी काँग्रेसची कमिटी लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेईल आणि पुढील निर्णय घेईल.' असं देखील अजित पवारांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कमिटीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याह काही प्रमुख नेते असतील. हे सर्वजण जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतील. त्यानंतरच ही कमिटी योग्य निर्णय घेईल. या कमिटीचा कल नेमका काय असेल हे लवकरच समोर येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vicky Kaushal : मुंबईच्या चाळीत जन्मलेला विकी कौशल आज गाजवतोय बॉलिवूड!, जाणून घ्या अभिनेत्याविषयी Unknown Facts

Buldhana News: धक्कादायक! शेगाव एस. टी. आगाराचा कारभार प्रशिक्षणार्थींच्या हातात; प्रवाशांच्या जिवाशी खेळ

Morning Drinks: दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळी 'या' पेयांचे करा सेवन, शरीर राहील निरोगी

Anil Deshmukh Full Speech | शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरून देशमुखांनी खडेबोल सुनावले

Manoj Jarange Patil News | बीडच्या नारायणगडमध्ये जरांगेंची सभा!

SCROLL FOR NEXT