काय आहे RTO लायसेन्स घोटाळा? विरोधकांचा सरकारवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर माहिती
RTO License Scam Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: काय आहे RTO लायसेन्स घोटाळा? विरोधकांचा सरकारवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर माहिती

जयश्री मोरे

अंधेरी आरटीओतमधून तब्बल 76 हजार वाहन चालकांना अवैध लायसन्स देण्यात आले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसंच एका लायसन्समागे 30 हजार रुपये घेतल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलंय. दरम्यान, भ्रष्टाचार करणाऱ्या आरटीओवर काय कारवाई करणार, असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.

''अंधेरी आरटीओने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे 76 हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत, अशी लायसन्स जारी केल्यानेच पुणे येथे घडलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणे घडत आहेत. दोन दुचाकींवर 41 हजार 93 ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, तर इतर 35 हजार 261 ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे'', अशी मागणी वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

काय आहे आरटीओचा घोटाळा?  

वर्ष 2023-24 मधील या 1 लाख 4 हजार ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले. 76 हजार 354 लायसन्स अवैध वाहनांवर कथित ड्रायव्हिंग टेस्ट करून दिले. दुचाकी आणि कार अशा केवळ चार वाहनांचा वारंवार वापर स्कूटरपासून क्रेनपर्यंत विविध श्रेणींच्या वाहनांसाठी ही 76 हजार 354 ड्रायव्हिंग लायसन देण्यात आल्याचा पर्दाफाश ड्रायव्हिंग लायसन्सच्या डेटामुळे झाला.

दोन दुचाकींवर 41 हजार 93 ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, त्यात- तीन-चाकी तसेच मालवाहतुकीच्या वाहनांसाठी 792 लायसन्सLMV आणि LMV-TRसाठी 3,501 लायसन्स,Motor Cycle with Gear वा OG किंवा गीअर नसलेली मोटारसायकलसाठी 36,319 लायसन्सट्रान्सपोर्ट व्हेइकल्ससाठी 385 लायसन्सट्रक, बस, क्रेन इत्यादीसारख्या अवजड वाहनांसाठी 96 लायसन्सएकूण संख्या 41 हजार 93 लायसन्स आहेत.

तर इतर 35 हजार 261 ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले. त्यात तीन-चाकी/मालवाहतुकीच्या वाहनांसाठी 881 लायसन्सLMV आणि LMV-TRसाठी 33,922 लायसन्सMCWG/OG किंवा गीअर नसलेल्या मोटारसायकलसाठी 121 लायसन्सट्रान्सपोर्ट व्हेइकल्ससाठी 306 लायसन्सट्रक, बस, क्रेन इत्यादींसारख्या अवजड वाहनासाठी 31 लायसन्सएकूण संख्या 35 हजार 261 लायसन्स आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडलेले मुद्दे:

- प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे.

-अंधेरी RTO ने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे ७६ हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहेत.

-अशी लायन्स जारी केल्यानेच पुणे येथे घटलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणे घडत आहेत.

- अर्जदार वा उमेदवाराची अनिवार्य ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स संबंधितांना दिले जाते. याअनुषंगाने 'सारथी'च्या ऑनलाइन डेटाद्वारे १ लाख ४ हजार ड्रायव्हिंग लायसन्सची पडताळणी केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

-२०२३-२४ मधील या १ लाख ४ हजार ड्रायव्हिंग लायसन्सपैकी ७६ हजार ३५४ लायसन्स अवैध वाहनांवर कथित ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्यानंतर जारी करण्यात आले होते. हे प्रमाण जवळपास ७५ टक्के आहे.

- दुचाकी आणि कार अशा केवळ चार वाहनांचा वारंवार वापर स्कूटरपासून क्रेनपर्यंत विविध श्रेणींच्या वाहनांसाठी ही ७६ हजार ३५४ ड्रायव्हिंग लायसन देण्यात आल्याचा पर्दाफाश ड्रायव्हिंग लायसन्सच्या डेटामुळे झाला.

- यासंबंधीचे तपशीलही उपलब्ध आहेत. दोन दुचाकींवर ४१ हजार ९३ ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले, तर इतर ३५ हजार २६१ ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले.

- लाइट मोटार व्हेइकलसाठी (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करताना दुचाकी वाहनांवर (मोटारसायकल) टेस्ट घेण्यात आल्या होत्या. तर, लाइट मोटार व्हेइकलवर ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन मोटारसायकल तसेच स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले. याशिवाय, तीनचाकी वाहनांच्या श्रेणीसाठी मोटार किंवा दुचाकी वाहनांवर ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन लायसन्स जारी करण्यात आले आहेत.

- “LMV साठी परवाने जारी करण्यात आले होते परंतु वाहन चालविण्याच्या चाचण्या दुचाकी (मोटारसायकल) वाहनांवर घेण्यात आल्या होत्या.

- मोटारसायकल/स्कूटर श्रेणीसाठी DL जारी करण्यात आले होते परंतु LMVs वर ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तीनचाकी वाहनांच्या श्रेणीसाठी डीएल जारी करण्यात आले होते परंतु मोटार किंवा दुचाकी वाहनांवर ड्रायव्हिंग चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

- यामुळे या सर्व चाचण्या घेतल्या गेल्या होत्या की नाही याबद्दल साशंकता निर्माण होते. प्रकरणे केवळ उदाहरण म्हणून आहेत. ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यासाठी कागदपत्रांबाबत योग्य प्रक्रियांचे पालन तसेच, संबंधित आरटीओ इन्सपेक्टरकडून वाहन तपशीलांची पडताळणी कशा प्रकारे केली गेली नाही, हे यावरुन स्पष्ट होत आहे.

- या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा बंदोबस्त केला पाहिजे.

- माणसं मेली तरी आरटीओना काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त पैसा द्या. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. आम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. अशा पद्धतीने बेदरकारपणे या कार्यालयाचा कारभार सुरू आहे.

- विशेष म्हणजे हे खातं मा. मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. तरी देखील या खात्यातल्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरत नाही. दलाल आणि एजंटांच्या विळख्यात हे खात अडकलं आहे.

- हे खातं मुख्यमंत्र्यांच आहे. ठाण्यापासून जवळ असलेल्या अंधेरी येथील आरटीओ कार्यालत 125 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा आकडा एका कार्यालयातला आहे.

- अशी 53 कार्यालये आहेत. म्हणजे या 53 कार्यालयातील भ्रष्टाचाराच्य़ा आकड्यांची बेरीज हजारो कोटींच्या घरात जाईल.

- मुख्यमंत्र्यांवरील भार हलका करण्यासाठी हा उद्योग सुरू आहे काय, असा प्रश्न यानिमित्ताने सुरू आहे.

- मुख्यमंत्र्यांकडे हे खाते आहे. अध्यक्ष महोदय दिव्याखाली अंधार आहे. त्यांच्याच खात्यात एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Session : आचारसंहिता जाहीर होण्याआधीच ७५ हजार कोटींपर्यंतच्या निविदा मंजूर; आव्हाडांच्या आरोपांवरून सभागृहात गदारोळ

Maharashtra Politics : मतांच्या राजकारणासाठी भाजपची 'नवाबी' भूमिका?; गंभीर आरोप केलेले भाजप, मलिकांच महायुतीत स्वागत करणार का?

Rahul Gandhi : विधानसभेच्या तयारीसाठी राहुल गांधी बणणार वारकरी; महायुतीत अस्वस्थता

Tourism Tips: One Day Trip करण्यासाठी हे ठिकाणं आहेत बेस्ट

Vastu Tips: झाडू वापरताना चुका नका करू, नाहीतर येईल दारिद्र्य

SCROLL FOR NEXT