block on western railway Saam tv
मुंबई/पुणे

Western Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या २ तासांचा ब्लॉक, लांबपल्ल्याच्या अनेक ट्रेन रद्द

Priya More

Mumbai News: पश्चिम रेल्वे मार्गावरुन (Western Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर गुरुवारी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील अतुल आणि वलसाड रेल्वे स्थानकादरम्यान हा दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे या मार्गावरुन जाणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर २४ ऑगस्ट २०२३ रोजी म्हणजे उद्या सकाळी ११.२५ वाजल्यापासून ते दुपारी १.२५ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अतुल आणि वलसाड रेल्वे स्थानकादरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वलसाड (Walsad) आरओबीच्या ३६ मीटर कंपोझिट गर्डरच्या लाँचिगसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या ब्लाकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या अनेक लांबपल्ल्यांच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही नियमित केल्या जाणार आहेत. हा ब्लॉक जरी कार्यकालीन वेळात घेण्यात येणार नसला तरी त्याचा परिणाम प्रवाशांवर होणार आहे. अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत त्याची यादी पाहूनच प्रवाशांनी पुढच्या प्रवासाचे नियोजन करावे.

या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणारी रेल्वे क्रमांक ०९१५४ वलसाड-उमरगाव मेमू आणि रेल्वे क्रमांक ०९१५३ उमरगाव- वलसाड मेमू या दोन ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही ट्रेन उशिराने धावणार आहेत. तर रेल्वे क्रमांक ०९७२४ वांद्रे टर्मिनस- जयपूर विकली स्पेशल ५५ मिनिटांनी नियमित केली जाणार आहे.

रेल्वे क्रमांक १९०१५ दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस ३५ मिनिटांनी नियमित केली जाईल. रेल्वे क्रमांक १२९२६ अमृतसर- मुंबई सेंट्रेल एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटांनी नियमित केली जाईल. तर, रेल्वे क्रमांक २२९५४ अहमदाबाद- मुंबई सेंट्रल गुजरात एक्स्प्रेस १ तास ३० मिनिटांनी नियमित केली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT