S Somanath On Chandrayaan 3: आता लक्ष पुढील 14 दिवसांवर, नेमकं काय होणार; इस्रो प्रमुख म्हणाले...

Chandrayaan-3 Landed Successfully: आता लक्ष पुढील 14 दिवसांवर, नेमकं काय होणार; इस्रो प्रमुख म्हणाले...
S Somanath On Chandrayaan 3
S Somanath On Chandrayaan 3Saam Tv
Published On

S Somanath On Chandrayaan 3: भारताच्या चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरून इतिहास रचला आहे. आज (बुधवारी) संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिणेकडील भागात यशस्वी लँडिंग केले. यानिमित्ताने जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या यशावर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, ''चांद्रयान- 2 पासून खूप काही शकलो. त्यामुळे सर्व चुका टाळता आल्या. सर्वच विभागातील सर्वांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलत आपलं मिशन पूर्ण केलेलं आहे. सर्वांनी केलेल्या कामाला यश आलेलं आहे.''

S Somanath On Chandrayaan 3
Chandrayaan-3 Landed Successfully: 'अभिनंदन भारत, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं', चांद्रयान ३ ने पाठवला चंद्रावरून पहिला मेसेज

एस सोमनाथ म्हणाले की, आता लक्ष आहे ते पुढील 14 दिवसांवर आहे. पुढील काळात चांद्रयानकडून येणारी माहिती ही जगासाठी महत्त्वाची ठरणार आहे. हे मिशन सक्सेस करण्यासाठी सर्वांचाच हातभार लागलेला आहे. (Latest News Update)

कोण आहेत इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ?

चांद्रयान 3 मोहिमेच्या यशामागे इस्रोमधील प्रकल्प संचालक पी वीरामुथुवल आणि त्यांच्या टीमची मेहनत आहे. असं असलं तरी संपूर्ण ऑपरेशन इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले आहे. एस सोमनाथ हे अंतराळ इंजिनीअरिंगशी संबंधित अनेक बाबींमध्ये तज्ज्ञ मानले जातात. वयाच्या 56 व्या वर्षी ते इस्रोचे प्रमुख झाले.

एस सोमनाथ यांची गेल्या वर्षी जानेवारीमध्ये इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. इस्रोचे प्रमुख होण्यापूर्वी एस सोमनाथ हे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (VSSC) संचालक होते. त्यांच्या पहिल्या इस्रो प्रमुखपदाची जबाबदारी डॉ.के.सिवन सांभाळत होते. जुलै 1963 मध्ये केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात जन्मलेल्या सोमनाथ यांचे पूर्ण नाव श्रीधर परिकर सोमनाथ आहे. स्थानिक शाळेतच त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर सोमनाथ यांनी केरळमधील कोल्लमच्या टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान सोमनाथ हे टॉपर्समध्ये असायचे. यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बंगळुरू येथून पोस्ट ग्रॅज्युएशनही केले. ते येथे सुवर्णपदक विजेते होते.

S Somanath On Chandrayaan 3
Chandrayaan-3 Landed Successfully: जय हो! चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं, अवघा भारत आनंदला!

सोमनाथ यांची पीएसएलव्हीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांच्या शब्दांत PSLV कार्यक्रम भारताच्या अंतराळ कार्यक्रमात बदल करणारा ठरला. पुढे देशाचे राष्ट्रपती झालेले डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे या प्रकल्पाचे संचालक होते. पीएसएलव्ही विकसित करण्यात सोमनाथ यांचे विशेष योगदान आहे.

अनेक विषयात तज्ज्ञ

शास्त्रज्ञ एस सोमनाथ हे एक नाही तर अनेक विषयांचे तज्ज्ञ आहेत. लॉन्च व्हेईकल डिझायनिंग माहीत आहे, लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स, मेकॅनिझम डिझाईन आणि पायरोटेक्निक्स या विषयात त्यांचे कौशल्य आहे. देशातील सर्वात शक्तिशाली अंतराळ रॉकेट GSLV MK-III लाँचर विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमचे त्यांनी नेतृत्व केले आहे. सोमनाथ हे 2010 ते 2014 पर्यंत GSLV Mk-III प्रकल्पाचे संचालक होते. या यानातून उपग्रह प्रक्षेपित केला जातो. GSLV (जिओ सिंक्रोनस लाँच व्हेईकल) च्या तीन यशस्वी मोहिमांमध्ये आणि PSLV च्या 11 मोहिमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com