Mumbai local train timetable changes from September 1 saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बदलणार; घराबाहेर पडण्यापूर्वी नवीन टाइम टेबल घ्या जाणून

Mumbai Local Train Timetable Revised: पश्चिम रेल्वेने १ सप्टेंबरपासून लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ६ नवीन फेऱ्या सुरू तर ६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून एसी लोकल सेवाही वाढणार आहे.

Bharat Jadhav

  • पश्चिम रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात १ सप्टेंबरपासून बदल लागू होणार आहेत.

  • दररोजच्या एकूण १,४१४ लोकल फेऱ्यांची संख्या कायम राहणार आहे.

  • प्रवाशांच्या सोयीसाठी ६ नवीन लोकल फेऱ्या सुरू, तर ६ जुन्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या, तुम्ही लोकल रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लोकल रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेने मु्ंबई उपनगरीय लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय. उद्यापासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून हे बदल लागू होतील. दररोज धावणाऱ्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या कायम ठेवत अनेक सेवांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या दररोज १,४१४ उपनगरीय फेऱ्या चालवल्या जातात. नवीन वेळापत्रकानुसार, प्रवाशांच्या गरजेनुसार ६ नवीन फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. तर ६ जुन्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या नवीन वेळापत्रकामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या १४५ वरून १४७ वर पोहोचणार आहे.

काय आहे नवीन वेळापत्रक

नवीन वेळापत्रकानुसार चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान दोन नव्या एसी लोकल धावतील. यात एक गाडी चर्चगेटवरून संध्याकाळी ५.२८ वाजता सुटेल. तर दुसरी बोरिवलीवरून संध्याकाळी ६.२४ वाजता रवाना होईल. भाईंदर ते विरारदरम्यान सकाळी ७.४६ वाजता एक नवीन लोकल सुटेल. आणि ती सकाळी ८.१२ वाजता विरारला पोहोचेल. बोरिवली ते भाईंदर आणि विरार दरम्यान रात्री उशिराच्या सेवा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच वांद्रे ते चर्चगेट दरम्यान सकाळी ११.५८ वाजता एक लोकल धावेल. विरार ते बोरिवली मार्गावर रात्री उशिरा एक लोकल धावेल.

या गाड्या केल्या रद्द

पश्चिम रेल्वेने नवीन फेऱ्या सुरू करण्यासह ६ जुन्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यात चर्चगेट-बोरिवली दरम्यान धावणाऱ्या दोन एसी फास्ट फेऱ्या आणि ४ नियमित उपनगरीय लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. दादर–विरार आणि विरार–डहाणू रोड या दोन वेगवेगळ्या फेऱ्या एकत्र करण्यात आल्या आहेत.

ही नवीन एकत्रित लोकल दादरवरून संध्याकाळी ५.२२ वाजता सुटेल. सध्या विरार ते दादर दरम्यान धावणाऱ्या दोन लोकल आता चर्चगेटपर्यंत प्रवास करतील. चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाऱ्या दोन लोकल बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. तसेच चर्चगेटवरून बोरिवलीसाठी जाणारी आणखी एक एसी स्लो लोकल आता थेट गोरेगावपर्यंत चालवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

नांदेडनंतर अकोल्यात असंवेदनशीलतेचा कळस, कृषीमंत्र्यांसमोरच अधिकारी मोबाईलवर मश्गुल

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT