Western Railway announces 10 days special block for sixth railway line-many trains cancelled check list Mumbai Western Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Train News: पश्चिम रेल्वे मार्गावर १० दिवसांचा विशेष ब्लॉक; लोकलच्या २५०० फेऱ्या रद्द

Railway 10 Days Special Block: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात १० दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Satish Daud

Western Railway Mega Block For 10 Days:

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात १० दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. वांद्रे ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासंदर्भात नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू करण्यात आले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार असून लोकल ट्रेनच्या २,५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर ते ०६ नोव्हेंबर दरम्यान हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वांद्रे-गोरेगाव दरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम रखडले होते. एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल ट्रेनचे मार्ग पूर्णपणे वेगळे करण्यासाठी ही सहावी मार्गिका तयार केली जात आहे. मार्ग संपूर्ण वेगळे करण्यासाठी बोरिवली आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सहावी मार्गिका तयार केली जात आहे.

त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, या विशेष ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने दररोज अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या १०० ते १५० लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर काही लोकल उशीराने धावत आहेत.

या ब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील बसला आहे. ११ दिवसांच्या कालावधीत ४३ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय १८८ एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास मार्ग कमी करण्यात आला आहे.

चर्चगेट-विरार दरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणार परिणाम

  • 27-28 ऑक्टोबर: 128 गाड्या रद्द

  • 29 ऑक्टोबर: 116 गाड्या रद्द

  • 30 ऑक्टोबर-3 नोव्हेंबर: 158 गाड्या रद्द

  • 4 नोव्हेंबर: 46 गाड्या रद्द

  • 5 नोव्हेंबर: 54 गाड्या रद्द

विरार ते चर्चगेट रेल्वे गाड्या रद्द

  • 27-28 ऑक्टोबर: 127 गाड्या रद्द

  • 29 ऑक्टोबर: 114 गाड्या रद्द

  • 30 ऑक्टोबर-3 नोव्हेंबर: 158 गाड्या रद्द

  • ४ नोव्हेंबर : ४७ गाड्या रद्द

  • 5 नोव्हेंबर: 56 गाड्या रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT