Demonetisation News
Demonetisation NewsSaam TV

Demonetisation News : देशात निवडणुकांपूर्वी पुन्हा नोटबंदी होणार; महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण

VBA Prakash Ambedkar Latest News : भाजप कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही.
Published on

भूषण अहिरे

VBA Prakash Ambedkar on Demonetisation :

आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी पुन्हा नोटबंदी लागू होईल, असं मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली.

आगामी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोटबंदी होईल. त्यामुळे ज्यांच्याकडे 500 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी 100 आणि 200 रुपयांच्या नोटांमध्ये त्या कन्व्हर्ट करून घ्याव्यात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Demonetisation News
Mumbai Crime News : मुंबई-जयपूर एक्सप्रेसमधील गोळीबाराचं रहस्य उलगडलं; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आहे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. तसेच भाजप कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा डाव वेळीच ओळखा, असा सल्ला देखील त्यांनी मराठा बांधवांना दिला आहे. (Political News)

Demonetisation News
Maharashtra Politics: 'टायगर इज बॅक'...निलेश राणेंचे सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन

ज्याप्रमाणे पॅलेस्टाईनमध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. तशाच प्रकारे भारतात देखील घमासान युद्ध येणाऱ्या काळात आरएसएस व भाजप जाती-जातीच्या आरक्षणाच्या नावावर लावण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केली. त्यामुळे हे घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com