Weather Updates Imd Predict Heavy Rain Next 3-4 Days in Maharashtra Many District Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Weather Updates: राज्यात पुढील ३ ते ४ दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain News: हवामान विभागाने (Weather Alert) जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Latest Updates:

ऑगस्ट महिन्यात राज्याकडे पाठ फिरवणारा पाऊस सप्टेंबर महिन्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबईत देखील पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने (Weather Alert) जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही आज पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मुंबई आणि पुण्यात आज पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात पावसाचा (Maharashtra Rain) जोर वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. पुण्यात उद्यापासून सलग तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातही येत्या ३-४ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ सप्टेंबरपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावेल अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत असल्याने मंगळवारपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील ५ ते ७ दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना पैसे वाटावे लागणे दुर्दैवी : अंबादास दानवे

Hitendra Thakur : पत्रकार परिषद घेऊ नका, असं कोणत्या कायद्यात आहे? हितेंद्र ठाकूर यांचा सवाल, VIDEO

Parola News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon Election: पाचोऱ्यात मविआच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक, आमदारावर आरोप

Vinod Tawde : '४० वर्षे निवडणुकीत...'; पैसे वाटप केल्याच्या आरोपावर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT