Mumbai Temperature
Mumbai Temperature Yandex
मुंबई/पुणे

Mumbai Temperature: काळजी घ्या! मुंबईत पुढील ३ दिवस सूर्य आग ओकणार, IMD कडून तापमानवाढीचा इशारा

Rohini Gudaghe

मुंबईकरांसाठी मोठी बातमी (Mumbai Temperature) आहे. मुंबईकरांना दमट परिस्थितीत उकाड्यापासुन दिलासा नाहीये, कारण येत्या काही दिवसांत तापमान ३७ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईमध्ये अजून तापमान वाढीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवार आणि सोमवार दरम्यान ३७ अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज (Mumbai Temperature Update) वर्तवला आहे.

उष्ण आणि दमट परिस्थितीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला (Mumbai News) आहे. मंगळवारी भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान ३४,२ अंश सेल्सिअस नोंदवले, तर कुलाबा किनारपट्टी वेधशाळेने कमाल ३२. १ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले आहे. शनिवारी हे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारपासून शहराच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या जवळ जाण्याची शक्यता (Heat Wave Mumbai) आहे. त्यामुळे शहर आणखी उष्णतेच्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊ शकते.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबईच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही उष्णतेची चेतावणी जारी केलेली नाही. किनारपट्टीच्या प्रदेशात किमान दोन दिवस तापमान 37 अंशांच्या पुढे गेल्यानंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला (Weather Update) जातो. उष्णतेच्या लाटेच्या चेतावणीसाठी बेंचमार्क 40 अंश सेल्सिअसवर सेट केला आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत उष्णतेची लाट आली होती. १६ एप्रिल रोजी तापमान ३९.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. भारतीय हवामान विभागात मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलं (Mumbai Temperature Likely To Rise) की, गेल्या ३० वर्षांत शहराच्या सामान्य कमाल तापमानात थोडीशी वाढ झाली आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान देखील वाढत आहे. त्यामुळे चक्रीवादळांची वारंवारता देखील वाढली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

उन्हाळ्यामध्ये राज्यभरातील तापमान (Heat Wave In Mumbai) १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. हवामानातील बदल तसेच काँक्रिटीकरण ही तापमान वाढीची काही संभाव्य कारणं आहेत. यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सून सुरू होईपर्यंत उष्णतेची लाट अधिक जाणवणार असल्याचं कांबळे यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यात निवडणूक सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने मतदान पार पडत आहे. भारतीय हवामान विभाग मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना दैनंदिन तापमान (Mumbai Weather Update) परिणाम आधारित अंदाज पाठवत असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT