Maharashtra Weather Update Today Saam TV
मुंबई/पुणे

Weather Alert : राज्यात आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई-पुण्यासह 'या' भागात कोसळणार पाऊस

Maharashtra Weather Update Today : मुंबई, ठाणे, रायगड तसेच पालघर जिल्ह्यात आज रविवारपासून पुढील ४८ तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Satish Daud

मुंबई : मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होऊन प्रचंड उकाडा जाणवू लागला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. आजही राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड तसेच पालघर जिल्ह्यात आज रविवारपासून पुढील ४८ तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातही पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार, अशा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. सध्या अरबी समुद्रातील महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

पुढील काही तासांत ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहील, तसेच घाटमाथ्यावरही तुफान पावसाची शक्यता आहे. मुंबईत मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे.

त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. सध्या मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पाऊस असे वातावरण सध्या आहे. दुसरीकडे धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही रविवारी अधून मधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ तसेच चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Benefits of walking: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली! दररोज चाला फक्त इतकी पावलं, वजनही होईल कमी

CNG Price Cut: नवीन वर्षात खुशखबर! CNG आणि PNG च्या किंमती झाल्या कमी; किती होणार फायदा?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

Hatgad Fort : हतगड किल्ला ट्रेकर्ससाठी भटकंतीचं खास ठिकाण, वीकेंडला नक्की जा

SCROLL FOR NEXT