Weather Forecast May 15 2024 IMD Rainfall Alert in Mumbai Thane Pune Nashik Saam TV
मुंबई/पुणे

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Rain Alert in Maharashtra : येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघरसह अर्ध्या महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटही होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघरसह अर्ध्या महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटही होण्याची शक्यता आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Heavy Rain) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांना अवकाळीने झोडपून काढलं आहे. सोसाट्याचा वारा असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झालाय. अजूनही जवळपास ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकाद मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघरला पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. रायगड आणि कोकणातील काही भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिसरात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

याशिवाय पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भ मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर बीड, जालना, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, अकोला, वाशिम वादळी वारा अन् मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT