"We will not stop, we will contest the Lok Sabha elections ..." - Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Assembly Election 2022: "आम्ही थांबणार नाही, आम्ही लोकसभा लढवू..." - संजय राऊत

Assembly Election Results 2022: गोव्यात आणि यूपीत प्रयत्न करत आहे. संघर्ष, धडपड केली आणि सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढणार आहे असं संजय राऊत म्हणाले.

जयश्री मोरे

मुंबई: देशाच्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे (Assmebly Elections 2022) कल हाती येतायात. देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत निवडणुका झाल्या असून आता त्यांचे कल हाती येतायत. या कलांनुसार पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे तर कॉंग्रेसची (Congress) पाचही राज्यात सत्ता येण्याची आशा मावळली आहे. याबाबत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही थांबणार नाही, आम्ही लोकसभा लढवू..." असा आत्मविश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. ("We will not stop, we will contest the Lok Sabha elections ..." - Sanjay Raut)

हे देखील पहा -

निवडणुकांच्या येणाऱ्या कलांबाबत राऊत म्हणाले की, बॅलेट पेपरची मोजणी सुरू आहे, दुपारपर्यंत सगळे निकाल येतील आणि यूपीत जरूर अखिलेश यादव (Akhilesh Yadav) टक्कर देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पुढे ते म्हणाले की - पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर येथे मोजणी सुरू आहे. आत्ता कुठ प्रत्यक्ष मंत मोजणीला सुरुवात झाली आहे. दोन तासानंतर कल कळेल. यूपीत मतदान जास्त आहे, मतदार जास्त आहे तिथे 5 वाजेपर्यंत सगळं क्लिअर होईल.

त्याचबरोबर राऊत म्हणाले की, आम्ही गोव्यात आणि यूपीत प्रयत्न करत आहे. आम्ही संघर्ष केला, धडपड केली आणि सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढणार आहे. आता दुसऱ्या राज्यात निवडणूक लढत आहे. बँलेट पेपरची मोजणी सुरू आहे दुपार पर्यंत सगळे निकाल येतील यूपीत जरूर अखिलेश यादव टक्कर देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT