मुंबई: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ जागा रिक्त आहेत. या १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ सदस्यांची यादी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी ही यादी अद्यापही मंजूर केलेली नाही. आता मविआ सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकाने या १२ जागांवर आपल्या गटातील आमदारांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मविआने पाठवलेल्या त्या सर्व १२ सदस्यांची यादी रद्द करावी असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पाठवलं आहे. याविरोधात कॉंग्रेस न्यायालयात जाणार अशी माहिती विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे. (Eknath Shinde Latest News)
हे देखील पाहा -
राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन सरकारने मविआ सरकारच्या अनेक निर्णयात बदल केला आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेली १२ राज्यपाल नामनिर्देशित यादी रद्द करण्यासंदर्भात पत्र दिलं आहे. तर दुसरीकडे ही यादी रद्द केल्यास महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाईल असा इशारा कॉंग्रेस नेते विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिला आहे.
कॉंग्रेस नेते तथा माजी मंत्री विजय वड्डेटीवार म्हणाले की, राज्यपालांना मर्यादित अधिकार आहेत. राज्यपालांना दिलेली यादी ही कॅबिनेटच्या मंजूरी नंतर पाठवली जाते, एकदा यादी दिल्यानंतर कारण देऊन फेटाळावी लागते. ती यादी अद्यापपर्यंत राज्यपालांनी फेटाळली नाही, याचा अर्थ ती यादी राज्यपालांच्या अजूनही विचाराधीन आहे. जर ही यादी रद्द केली तर आम्ही न्यायालयात दाद मागू. आमची यादी का रद्द केली? या संदर्भात आम्हाला सर्वोच्च न्यायालयात लढावं लागेल असं वड्डेटीवार म्हणाले.
सध्या आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी दिली जाऊ शकते, असंही बोलले जात आहे. (Eknath Shinde Latest News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.