Khadakwasla Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level : पुण्यातील धरणांच्या पाण्यासाठ्यात किंचित वाढ, 100 टक्के भरण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता

Pune News : पानशेत धरण १०० टक्के भरल्याने धरणातून सोमवारीदेखील विसर्ग सुरु आहे.

प्रविण वाकचौरे

Pune News :

पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरुच आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाने गेल्या दोन दिवसांत खडकवासला सर्कलमधील चार जलाशयांतील पाणीसाठ्यात ०.५० टीएमसीने वाढ झाली आहे. यासह धरण क्षेत्रातील पाणीसाठा २७.४ टीएमसी म्हणजे ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र गेल्यावर्षी याच दिवशी पाणीसाठी १०० टक्क्यांवर होता.

पानशेत धरण १०० टक्के भरल्याने धरणातून सोमवारीदेखील विसर्ग सुरु आहे. रविवारी २४०० क्युसेक वेगाने सुरु असलेल्या विसर्ग सोमवारी १५०० आणण्यात आला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, खडकवासला सर्कलमधील चार जलाशयांमध्ये सर्वात मोठा असलेल्या वरसगावमधील पाणीसाठा सोमवारी १२.५८ टीएमसी म्हणजे ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण क्षेत्रात जोरदार पावसाची नोंद झाल्यास धरणातून पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने सांगितले. (Latest Marathi News)

गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाचा जोर मात्र पूर्णपणे थांबलेला नाही. जलाशयांमध्ये पावसाच्या पाण्याची आवक सुरुच असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. (Tajya Batmya)

रविवारपासून पानशेत आणि वरसगावच्या पाणलोट क्षेत्रात २० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर भामा आसखेड धरणात सुमारे १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पवना धरणातील पाणीसाठा सोमवारी १०० टक्क्यांवर कायम आहे. पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या आंद्रा धरणातील जिवंत साठा ३ टीएमसी म्हणजेच ९६ टक्के इतका वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT