Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पाणी पुरवठा बंद  Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नवी मुंबईत आज पाणीबाणी, कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

NMMC Water Cut : नवी मुंबईतील मोरबे जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे १४ मे रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद. बेलापूर, वाशी, नेरूळ आदी भागांवर परिणाम. रत्नागिरीत आठवड्यातून एकदा सोमवारस पाणी कपात लागू – पाण्याचा साठा टिकवण्याचा प्रयत्न.

Namdeo Kumbhar

Water Supply Shutdown in Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील अग्रोळी पुलाजवळील रेल्वे ट्रॅकशेजारी आणि शिखले गावाजवळील पुलाखालील जलवाहिनीतून सातत्याने पाणीगळती होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सदर जलवाहिनी बदलण्याचे काम बुधवारी करण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावरून नवी मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा आजपासून गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

यामुळे महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच कामोठे आणि खारघर या विभागांमध्ये १४ आणि १५ मे रोजी दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांना या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक ती व्यवस्था करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पाणीगळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असून, नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेने केली आहे.

रत्नागिरीत आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपात

रत्नागिरी शहराला आता आठवड्यातून एकदा पाणी कपात करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. उपलब्ध पाणीसाठा १० जूनपर्यंत पुरेल इतका आहे. तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सध्या तरी आठवड्यातून एकदाच दर सोमवारी पाणी कपात सुरू करण्यात आलीय. रत्नागिरी शहराला दररोज १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज दीड तास पाणीपुरवठा केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT