Mumbai Dam Water Level Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांनो पाण्याची चिंता विसरा! पुरून उरेल इतका पाणीसाठा जमा; सातही धरणात किती टक्के पाणी?

Mumbai Rain And Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या मुंबईतील सात जलाशयांमधील पाण्याची पातळी 93.23 टक्क्यांवर पोहोचली.

Satish Kengar

मुंबईत गेल्या दीड महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या मुंबईतील सात जलाशयांमधील पाण्याची पातळी 93.23 टक्क्यांवर पोहोचली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या साठी तलावांमध्ये एकत्रित पाणीसाठा सध्या 13,49,365 मिलियन लिटर इतका आहे, जो क्षमतेच्या 93.23 टक्के इतका आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा

मुंबईला तुलसी , तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या धरणातून पाणी पुरवले जाते. यातच बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, खालीलप्रमाणे धरणाच्या पाणीसाठात वाढ झाली आहे.

- अप्पर वैतरणा - 89.10 टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - 98.91 टक्के पाणीसाठा.

- तानसा - 97.80 टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - 97.14 टक्के पाणीसाठा

- भातसा - 91.20 टक्के पाणीसाठा.

- विहार - 100 टक्के पाणीसाठा.

- तुलसी - 99.46 टक्के पाणीसाठा

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणखी एक तलाव, मध्य वैतरणा तलाव 4 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे विहार आणि मोडक सागर तलाव 25 जुलै रोजी मोठ्या प्रमाण पाणीसाठा जमा झाला. 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तानसा तलाव ओव्हरफ्लो झाला, त्यामुळे सातही जलाशयांमध्ये एकाच दिवसात 17 दिवसांनी पाणीसाठा वाढला.

ठाण्यातील शाहपूर भागात असलेल्या तानसा तलावातून मुंबईला अंदाजे 400 मिलियन गॅलन पाणीपुरवठा केला जातो. 26 जुलै 2024 रोजी हाही ओव्हरफ्लो झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT