Water Cut Saam TV
मुंबई/पुणे

Water Cut : आजच पाणी साठवून ठेवा; ठाण्यासह नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा खंडीत

Water Cut in Navi Mumbai and Thane : ठाण्यात पावसाळापूर्व अत्यावश्यक निगा आणि देखभाल दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे बुधवारी ठाण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Ruchika Jadhav

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यात पावसाळापूर्व अत्यावश्यक निगा आणि देखभाल दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे बुधवारी ठाण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पावसाळापूर्व विविध कामांसाठी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी ही कामे केली जातात. पावसाळ्याआधी ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्या आहेत त्याची दुरुस्ती करणे, तसेच काही पाईपलाईन या गंजलेल्या असतात त्या बदलणे अशी सर्व कामे केली जातात.

पाणीपुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण या दोन्हींकडे बुधवार आणि गुरुवार २९ मे, २०२४ रोजी सकाळी ९.०० ते गुरूवार, ३० मे, २०२४ रोजी सायंकाळी ९.०० असे २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.

या शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणे महापालिका क्षेत्रातील

घोडबंदर रोड

लोकमान्य नगर

जेल

गांधीनगर

इंटरनिटी

वर्तकनगर

साकेत

ऋतू पार्क

इंदिरानगर

श्रीनगर

समतानगर

रुस्तमजी

सिद्धांचल

रुपादेवी

सिद्धेश्वर

जॉन्सन यांच्यासह मुंब्रा आणि कळवा यांचा काही भाग येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

नवी मुंबईतही पाणीपुरवठा बंद राहणार

नवी मुंबईमध्ये देखील दुरुस्तीच्या कामासाठी काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. खारघर आणि कामोठे नोडमध्ये उद्या म्हणजेच मंगळवारी पाणीपुरवठा बंद असेल. सिडकोच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी खारघर आणि कामोठे नोडमध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे. उद्या सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेत पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशीच जास्त पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

SCROLL FOR NEXT