मराठवाड्यावर भीषण जलसंकट
Marathwada Water CrisisSaam Tv

Marathwada Water Crisis: चिंता वाढली! मराठवाड्यावर भीषण जलसंकट; ८ जिल्ह्यांत केवळ ११.७० टक्के पाणीसाठा, नागरिकांची वणवण

Chhatrapati Sambhajinagar News: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्याची चिंता वाढली आहे. ८ जिल्ह्यांमध्ये फक्त ११.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मराठवाड्यावर भीषण जलसंकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये केवळ ११.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मराठवाडा विभागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाळा लांबणीवर पडला तर पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट मराठवाड्यावर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

मराठवाड्याला (Marathwada Water Crisis) मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पासोबतच गोदावरी नदीवरील बंधारे, तेरणा-मांजरा नदीवरील बंधाऱ्यामधून पाणीपुरवठा केला जातो. आता या स्त्रोतांमध्ये केवळ ११.७० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील एकूण ११ मोठ्या प्रकल्पापैकी पाच प्रकल्पांचा पाणीसाठा शून्यावर पोहोचला आहे. ते प्रकल्प मृत साठ्यात पोहोचले आहेत.

मराठवाड्यामध्ये (Marathwada Water Storage) मोठे प्रकल्प असलेल्या ११ प्रकल्पामध्ये केवळ १४.३५ टक्के इतका पाणीसाठा आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पांत ५.८५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापेक्षाही लहान असलेल्या ७४९ लघु प्रकल्पांमध्ये ६. ७१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, सीना कोळेगाव, निम्नतीरणा हे प्रकल्प कोरडे पडले (Chhatrapati Sambhaji Nagar News) आहेत. सध्या मृत साठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. त्यातूनच या परिसरातील गावांची तहान भागवली जात आहे.

मराठवाड्यावर भीषण जलसंकट
Marathwada Water Grid Project: मराठवाड्यात १४४ लघु मध्यम प्रकल्प कोरडे; भूजल साठा घटल्याने पाणी टंचाईची भीषण स्थिती

जायकवाडी धरणात फक्त ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न दुधना प्रकल्पात ४ टक्के, येलदरीमध्ये २९ टक्के, उर्ध्व पेनगंगामध्ये ३४, निम्न मनारमध्ये २४, विष्णुपुरीमध्ये २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील (Marathwada News) मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प असलेल्या ७५० प्रकल्पांपैकी १६६ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ३५९ प्रकल्प हे जोत्याखाली आहेत. ते कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. तर १६६ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे.

मराठवाड्यावर भीषण जलसंकट
Unseasonal Rain Hits Marathwada: अवकाळीचा मराठवाड्यातील 976 गावांना फटका;9 हजार 210 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com