water cut decision may be in june for pimpri chinchwad know the pawana dam water level Saam Digital
मुंबई/पुणे

मावळसह पिंपरी चिंचवडकरांवर जलसंकट, जाणून घ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्याची स्थिती, Video

do you know the pawana dam water level? जून महिन्यात पाऊस न झाल्यास शेतीसाठीही पाण्याच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांसह मावळ मधील शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते असं चिन्ह सध्या तालुक्यात आहे.

दिलीप कांबळे

मावळ तालुक्यातील शेती ही धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. औद्योगिक नगरी असलेली पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 30 दिवस पुरेल इतकाच म्हणजेच 23.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील इतर धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. यामुळे शेतक-यांसह पिंपरी चिंचवडकरांना पावसाच्या प्रतिक्षेत आहेत अन्यथा जलसंकटाचा सामना करावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मावळ तालुक्यात पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो. हा पाऊस खरीप हंगामातील भात शेतीसाठी पूरक असा आहे. त्यानंतर रब्बीच्या पिकासाठी शेतकऱ्यांना धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.

दरवर्षी परतीचा पाऊस चांगला होत असल्याने ऑक्टोबर महिन्यात धरणे शंभर टक्के भरली असतात. त्यामुळे सर्व धरणातील पाणीसाठा शेतकऱ्यांना वर्षभर पुरतो. मात्र गेल्यावर्षी अपेक्षित परतीचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचा ऑगस्ट महिन्यात वापर होऊ लागला.

यंदा उन्हाळा देखील तीव्र असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली तर मावळातील शेतकरी वर्गाला आणि पिंपरी-चिंचवड शहराला हाेणा-या पाणी पूरवठ्यात कपात करावी लागणार असे चित्र सध्या आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT