Mumbai Water Cut: मुंबईत पाणीबाणी, तानसा जलवाहिनीला गळती; भांडूप, धारावीसह अनेक भागातील पाणीपुरवठा खंडित! Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut: मुंबईत पाणीबाणी, तानसा जलवाहिनीला गळती; भांडूप, धारावीसह अनेक भागातील पाणीपुरवठा खंडित!

Mumbai Water Cut: पाइपलाइनवरील दुरुस्तीचे काम बीएमसीकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे २४ तास लागतील, असे सांगण्यात आलेय.

Namdeo Kumbhar

Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तानसा जलवाहिनीला अचानक गळती लागली, त्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा खंडीत झाला. पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पुलाजवळ जलवाहिनीला गळती लागली. त्यामुळे भांडूप, धारावीसह अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाइपलाइनवरील दुरुस्तीचे काम बीएमसीकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे २४ तास लागतील, असे सांगण्यात आलेय. या काळात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.

भांडूप, पवई, क-पूर्व प्रभाग (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, विलेपार्ले), G-North Ward (दादर, धारावी), आणि एच-पूर्व प्रभाग (वांद्रे पूर्व, कलिना, सांताक्रूझ), जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पुलाजवळ मंगळवारी पहाटे मोठ्या गळतीमुळे प्रभावित झाली. पवई येथील तानसा वेस्ट वॉटर पाईपलाईनवर अचानक गळती झाली. त्यामुळे तानसा पाइपलाइनमधून होणारा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, पण ते पूर्ण होण्यासाठी सुमारे २४ तास लागतील, असे सांगण्यात आलेय.

दुरुस्तीचे काम सुरू असताना पवई ते धारावीला पाइपलाइनद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय. त्यामुळे एस वॉर्ड, K-East Ward, जी-उत्तर वॉर्ड आणि एच-पूर्व वॉर्डमधील काही भागांना पाणीपुरवठा खंडित होईल. त्याशिवाय काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दुरुस्तीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोणत्या विभागात पाणी पुरवठा बंद राहणार?

एस विभाग – गौतमनगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्‍ता, मिलिंद नगर, एल ऍण्ड टी परिसर

के/पूर्व विभाग – ओम नगर, साहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रूग्‍णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर

जी/उत्तर धारावी – पाणीपुरवठा बंद

एच/पूर्व -: बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

SCROLL FOR NEXT