Dharavi Police station Jayshree More
मुंबई/पुणे

Mumbai News : धारावी हादरली! पत्नीसमोरच पतीची सपासप वार करुन हत्या, पत्नीही जखमी

Dharavi News: काल (मंगळवारी) रात्री ८ च्या सुमारास एका व्यक्तीची पोटात चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Dharavi Crime News: धारावीमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. काल (मंगळवारी) रात्री ८ च्या सुमारास एका व्यक्तीची पोटात चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ९० फूट रोडवर ही घटना घडली असून येथून धारावी पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. मात्र तरीदेखील असा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव जाहिद असे असून ते आपल्या पत्नीसोबत एका ठिकाणी जात होते. यावेळी दोन जण पाठीमागून आले आणि त्यांनी थेट जाहिद यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्या पाठीवर आणि पोटावर चाकूने वार केले. या हल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेवेळी मृत व्यक्तीची पत्नी देखील त्यांच्यासोबत होती. त्यामुळे त्यांनी हल्लेखोरांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. जिवाच्या अकांताने त्या आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपतार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जाहिद हे सेक्युरिटी म्हणून काम करत होते. पत्नीसह ९० फूट रोडवरून ते आपल्या दुचाकीने जात असताना त्यांचे वाहन थांबवून त्यांच्यावर चाकूने वार केले गेले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला असे, धारावी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आरोपीं विरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

SCROLL FOR NEXT