BMC Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेच्या सांगण्यावरुन मुंबईची प्रभाग रचना; भाजपचा आरोप

चुकीच्या प्रभाग रचनेबद्दल भाजप हायकोर्टात जाणार असल्याचे प्रसाद लाड म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई (Mumbai) महानगर पालिका प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावर आता भाजपने (BJP) आक्षेप घेतला आहे. चुकीच्या प्रभाग रचनेबद्दल भाजप हायकोर्टात जाणार असल्याचे भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले.

शिवसेनेच्या (Shivsena) सांगण्यावरून भाजपला फटका बसेल अशी प्रभाग रचना केल्याचा प्रसाद लाड यांनी आरोप केला आहे. एका मंत्र्याने हे सर्व केलं असल्याचे लाड म्हणाले. जवळपास १४० प्रभागांमध्ये शिवसेनेच्या सांगण्यावरून बदल केले आहेत. चुकीच्या प्रभाग रचनेबद्दल भाजप हायकोर्टात जाणार आहे, असंही लाड म्हणाले.

याअगोदर काँग्रेसने (Congress) प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता. आता भाजपनेही यावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीची काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता शिवसेनेला इशारा दिला आहे. मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन नाना पटोले शिवसेनेसोबत पंगा घेणार का अशी चर्चा सध्या सुरु झालीय आहे. मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन कोर्टात जाण्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. मित्रपक्षांचे नुकसान होणार नाही. याची काळजी घ्या असंही नाना पटोले म्हणाले. त्यामुळे आता वॉर्ड रचनेवरुन महाविकास आघातीतच आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

मुंबईत नव्याने वाढणाऱ्या ९ प्रभागांपैकी ३ प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत. शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये, पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत. वाढीव ९ वॉर्ड पैकी ६ वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात. यावरुनच टीका सुरु असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करा अशी मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. वकील ऍड असीम सरोदे यांनी बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी करत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती सय्यद आणि न्यायमूर्ती आहुजा यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT