Crime News , Wakad, Pimpri Chinchwad, Police Saam TV
मुंबई/पुणे

Pune : तृतीयपंथीयांच्या पार्टीत मारामारी, एकाचा मृत्यू; बार मालकासह सहा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

वाकड पाेलीसांनी घटनेचा कसून तपास केला.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : वाकड (Wakad) पाेलीस (Police) ठाणे अंतर्गत असणा-या एका हाॅटेलमध्ये (बार) तृतीयपंथीयांची डान्स पार्टी सुरू असताना मारामारी झाली हाेती. या घटनेनंतर अभय गोंडाने या युवकाचा (youth) रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या प्रकरणी वाकड पाेलिसांनी सहा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी : डान्स पार्टी सुरु असताना झालेल्या मारामारीनंतर अभय गोंडाने हा युवक गंभीर जखमी झाला होता. या माराहणीत स्वतःचा जीव वाचविण्याकरिता अभय गोंडाने याने भुजबळ चौका जवळील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत स्वतःच जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा पुढे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

घटना सीसीटीव्हीत कैद

आता या घटनेची थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहेत. साम टीव्हीच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभय गोंडानेला बार मालक, चालक आणि बार मधील बाऊन्सर मारहाण करताना दिसत आहेत. तसेच अभय स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना उडी मारत असतानाची दृश्य देखील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत.

या प्रकरणात वाकड पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संबंधित हाॅटेल व बारचा मालक अनुराग मधुकर गोळे, व्यवस्थापक गजानन नामदेव खरात, बाउन्सर आशुतोष संजय मंनदुमले, बार टेंडर रोब्ल्यू अब्दुल बारेक आवल आणि डीजे गणेश प्रकाश डागा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असल्याची माहिती सत्यवान माने (पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन, वाकड) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men Hair Care: मुलांनी दररोज केस धुवावे का?

Banjara Community: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा; नाहीतर बंजारा समाज रस्त्यावर उतरून लढाई लढेल|VIDEO

Maharashtra Live News Update: : - विसर्जनाच्या रात्री पुणे मेट्रोत तुफान गर्दी

Ganpati visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्येचा थरार, तरुणावर चाकूने वार; घटनेचा Video Viral

Garba Dress: गरबा नाईटसाठी 'हे' ट्रेंडी आणि कम्फर्टेबल आउटफिट यावर्षी नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT