अश्विनी जाधव केदारी
पुणे: पुण्यातील मुंढवा Mundhawa Pune परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या Hotel In Pune तेराव्या मजल्यावरून कामगाराने (वेटर) उडी मारून आत्महत्या Jumped From 13th Floor केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित कामगाराने फेसबुकवर लाइव्ह Facebook Live करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला. त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने नमूद केले आहे.
हे देखील पहा-
अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी, मुंढवा पोलीस ठाण्यात Police Station Mundhawa अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद हा मूळचा उत्तराखंडचा Uttarakhand रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला आला होता आणि याठिकाणी तो वेटरचे काम तो करत होता. बुधवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास तो हॉटेलच्या टेरेसवर म्हणजेच तेराव्या मजल्यावर (On the thirteenth floor) गेला. त्या ठिकाणी जाऊन त्याने फेसबुक लाइव्ह करत केलं आणि त्यामध्ये तो आत्महत्या करणार आहे असे सांगितले. यावेळी त्याने हॉटेलमधील काही लोकांवर आरोप करत त्यांनी आपले वाईट केले आहेत आणि फसवून काही कामे करून घेतले असे म्हटले आहे.
त्यानंतर तो हॉटेलच्या भिंतीवर उभा राहिला! हा प्रकार पाहून तेथील नागरिकांनी त्याला समजावून थांबविण्याचा, अडवण्याचा प्रयत्न करेपर्यंत, त्याने काही क्षणातच खाली उडी मारली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अरविंद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला होता. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात Sasoon Hospital Pune दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी त्याचे आत्महत्या करण्या मागचे नेमके काय कारण? याचा शोध सुरू आहे, अशी माहिती मुंढवा पोलिसांनी दिली.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.