बीड: "2014 मध्ये ज्यांनी पद्मश्री दिला, त्या लोकांनी स्वातंत्र्य दिलं" असं म्हणणाऱ्या कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते, त्यांना सिडीसीएन ऍक्टनुसार जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी केली आहे. (I am ashamed of people who have taken Padma Shri like Kangana - MP. Rajni Patil)
हे देखील पहा -
ज्यांना लाखो स्वातंत्रवीरांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य भीक वाटते, अशा लोकांना अटक करून जेलमध्ये टाकलं पाहिजे. मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायला सुद्धा शरम येत आहे. त्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते, कारण माझ्या घरामधील आई-वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत. माझे आजोबा गदर चळवळीत 26 व्या वर्षी फासावर चढले, लाखो घरातून एवढे मोठे बलिदान दिले आहे. भगतसिंग या शहिदांना विसरून 2014 मध्ये ज्यांनी पद्मश्री दिला त्या लोकांनी स्वातंत्र्य दिलं, असं म्हणता अशा पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते असं म्हणत त्यांना कंगणाला धारेवर धरलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, अन्नदात्या शेतकऱ्याला रस्त्यावरील लोक म्हणणाऱ्याची बौद्धिक दिवाळखोरी आहे. अशा लोकांना सी डी सी एन अंतर्गत जेलमध्ये टाकले पाहिजे. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना हे वक्तव्य केलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.