Kasarvadavli Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Wadala- Kasarvadavli Metro: मुंबई-ठाण्याचा प्रवास होणार गारेगार! ४५ मिनिटे वाचणार; मेट्रोची ट्रायल सुरु

Wadala To Kasarvadavali Metro 4 And 4A Extension To Gaimukh: मुंबई ते ठाणे लवकरच जोडले जाणार आहे. वडाळा आणि कासारवडवली जोडले जाणार आहे. मेट्रो 4 आणि 4A साठी ट्रायल सुरु आहेत.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्यामुळे प्रवास सुखकर झाला आहे. मुंबईत पुढच्या काही वर्षात अनेक मेट्रोल लाइन सुरु होणार आहे. यातील महत्त्वाची मेट्रो लाइन म्हणजे मेट्रो 4 & 4A. यामुळे मुंबई आणि ठाणे जोडले जाणार आहे. एमएमआरडीएने नुकतीच मेट्रो 4 & 4A साठी ट्रायल सुरु केली आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख यादरम्यान ही ट्रायल घेतली जात आहे.

वडाळा ते कासारवडवली मेट्रो (Wadala To Kasarvadavali)

वडाळा ते कासारवडवलीला जोडणारी मेट्रो 4 लाइन लवकरच सुरु होईल. यामध्ये ३० स्थानके असणार आहे. याच मेट्रो 4 लाइनपासून २.७ किलोमीटरनंतर मेट्रोल लाइन 4A साठी एक्स्टेन्शन होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. जवळपास ७५ टक्के वेळ वाचणार आहे.

मेट्रो 4 मधील स्थानकांची नावे (Metro 4 Station Names)

वडाळा ते कासारवडवलीला जोडणारी ही मेट्रो ३२.३२ किलोमीटर लांब आहे. यामध्ये ३० स्थानके आहेत. भक्ती पार्क मेट्रो, वडाळा आयटी, अनिक नगर बस डेपो, सिद्धार्थी कॉलनी, गरोदिया नगर, पंत नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सुर्या नगर, गांधी नगर, नवल हाउसिंग, भांडूप महापालिका, भांडूप मेट्रो, शंगरिला, सोनापूर, मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका, ठाणे तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजी-नी-वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन आणि कासारवडवली असे स्टेशन असणार आहेत.

थेट ईस्टर्न एक्सप्रेसला जोडणार (Metro 4 Connectivity)

मेट्रो 4मुळे प्रवास खूप सोपा होणार आहे. तुम्ही थेट ईस्टर्न एक्सप्रेस रोडवेला कनेक्ट होणार आहे. मध्य रेल्वे, मोनो रेल आणि मेट्रो 2B, मेट्रो लाइन 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो लाइन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) येथे कनेक्ट होणार आहे. या मेट्रोमुळे तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहे. याचसोबत तेथील रहिवासी जागेचा विकास होणार आहे.

मेट्रो 4A (कासारवडवली-गायमुख) (Kasarvadavali To Gaimukh)

वडाळा ते कासारवडवली या मेट्रोला जोडून कासारवडवली ते गायमुख मेट्रो जोडली जाणार आहे. Metro Line 4A ही कासारवडवली ते गायमुख अशी असणार आहे. २.७ किलोमीटरचे हे अंतर असणार आहे. यामुळे अनेक मेट्रो जोडल्या जाणार आहे. तुम्ही मुंबईसह पुढे कल्याणला जोडले जाणार आहात.यासाठी नवीन मेट्रो सुरु केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

SCROLL FOR NEXT