Vishal Agarwal Saam TV
मुंबई/पुणे

Vishal Agarwal News: विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ, आणखी दोन गुन्हे दाखल होणार, कारण काय?

Pune Porsche Accident Case Update: पुणे अपघात प्रकरणातील अलवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

Satish Kengar

पुणे अपघात प्रकरणातील अलवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. त्यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला जाणार आहे. तसेच अलवयीन मुलासोबत असलेल्या चालकाला, ''तू कार चालवत होता, असं पोलिसांना खोटं सांग'', असं विशाल अग्रवाल यांनी चालकाला सांगितलं होतं, हे पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

तसेच विशाल अग्रवाल यांच्या विरोधात आरटीओने देखील तक्रार दिली होती. यानंतर आता त्यांच्यावर ४२० च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल होऊ शकतो. पोर्शे कारची नोंदणी झाली नसताना, नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याने, हा गुन्हा दाखल केला जाईल.

पुणे कोर्टात 6 आरोपींविरोधात सुनावणी

दरम्यान, पुणे अपघात प्रकरणातील सहा आरोपींविरोधात सुनावणी पार पडली. यातले चार आरोपी हे पबचे मालक आहेत. या सहा आरोपींची आज पोलीस कोठडी संपत आहे. आज पोलिसांनी दोन जास्त कलम लागू करून कोर्टाकडे रिमांड रिपोर्ट सादर केला आहे. यात ⁠४२० हे कलम वाढवले आहे, तर २०१ कलमसाठी अर्ज दाखल केला. ⁠पोलिसांनी याआधारे पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

विशाल अग्रवाल यांच्यावतीने युक्तिवाद करताना त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे की, घटनेच्या दिवशी ⁠गंगाराम नावाचा चालक होता. चालक पहिल्या दिवसापासून तपासाठी उपलब्ध आहे. ⁠१७५८ रुपये आरटीओची फी भरली नाही, म्हणून आयपीसीचा ४२० लावला आहे. मात्र अशा प्रकारे टाडा, मोका लावणं, हे योग्य आहे का? ⁠आतापर्यंत आरटीओ काय करत होते? गाडी कधी घेतली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ⁠आरोपींकडे कागदपत्रे होती, म्हणून पोलिसांना कळले टॅक्स भरला नाही. मग आता कोणती कागदपत्रे हवी आहेत, गाडीशी संबधीत सर्व कागदपत्रे पोलीसांना मिळाली आहे. दरम्यान, सुनावणी संपली असून यावर न्यायालय थोड्याच वेळात निर्णय देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT