Virar Fight Video Saam Tv
मुंबई/पुणे

Virar News: विरारमध्ये पुन्हा एकदा गुंडगिरी; डोक्यात लोखंडी रॉड अन् काठ्यांनी हल्ला करत दोन गटांत तुंबळ हाणामारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन इंगळे

Virar Fight Video:

विरार पूर्व मनवेल पाडा मोहक सिटी समोरील मुख्य रस्त्यावर गुंडांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. काल मंगळवार (२६ डिसेंबर) रोजी रात्री 11:30 च्या सुमारास लाठी काठ्या आणी लोखंडी रॉडने गुंडांमध्ये हाणामारी झाली आहे. या हाणामारीमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.

दोन गुंडाच्या गटात ही हाणामारी झाली असून यात एकाच्या डोक्याला लोखंडी रॉडचा जोरात मार लागला असून तो जखमी झलाा आहे. (Latest News)

दोन गटातील हाणामारी एवढी तीव्र होती की,पोलिसांना याप्रकरणाची दखल घ्यावी लागली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांना लाठी चार्ज करून मौपची पांगवा पांगवी करावी लागली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचताच गुंड घटना स्थळावरुन फरार झाले आहेत. या हाणामारीचे कारण अद्याप समजू शकले नाहीये.

भर रस्त्यात हाणामारीच्या घटनेने परिसरतील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विरारमध्ये मुख्य रस्त्यात पोलीस असताना देखील गुंडांची दहशत पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विरारमध्ये सातत्याने गुंडगिरी, हाणामारीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी आता सर्व सामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. पोलीस याप्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

Arabian Sea Shiv Smarak : 8 वर्ष झाली, स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही; अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले

SCROLL FOR NEXT