Farmer March in Pune : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी आक्रमक, 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला आजपासून प्रारंभ

Mahavikas Aghadi Farmer March in Pune : शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. मात्र या मुद्द्यावरुन त्यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले होते.
Farmer March in Pune : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी आक्रमक, 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला आजपासून प्रारंभ
Published On

अक्षय बडवे/रोहिदास घाडगे

Pune News :

राज्यातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळीमुळे अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं काही झालं नाही. याशिवाय शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी विरोधकांची महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

महाविकास आघाडीच्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला आजपासून होणार प्रारंभ आहे. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी जाहीर सभा देखील पार पडणार आहे. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला आज प्रारंभ होणार आहे.

खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता ३० तारखेला होणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. मात्र या मुद्द्यावरुन त्यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीने आंदोलनचा पवित्रा घेतला आहे.

कसा निघेल मोर्चा

किल्ले शिवनेरीवरुन शेतकऱ्यांचा आवाज केंद्र आणि राज्य सरकारपर्यत पोहचवण्यासाठी आक्रोश मोर्चा निघणार आहे. किल्ले शिवनेरीवरुन निघणारा हा मोर्चा ओतुर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर असा निघणार असून संध्याकाळी चाकण औद्योगिक नगरीत मशाल मोर्चात रुपांतर होणार आहे.

मोर्चाच्या प्रमुख मागण्या काय?

  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित 'शैक्षणिक कर्ज ' धोरण लागू करणे.

  • कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण आखणे.

  • खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे

  • बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा द्यावा.

  • पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई देणे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com