Crime News saam tv
मुंबई/पुणे

Virar Crime: कामावरुन घरी परतलीच नाही... विहिरीत आढळला मृतदेह; ३८ वर्षीय महिलेसोबत काय घडलं?

नेहमी ती सायंकाळी सहा साडेसहा दरम्यान घरी येत होती. मात्र वेळेवर न आल्याने तिचा शोध सुरू केला.

चेतन इंगळे

Virar Crime News: विरार पूर्वेकडील शिरसाड येथील एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत आता मांडवी पोलिस अधिक तपास करत आहेत.. (Crime News IN Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, शिरसाड येथील राऊत पाडा येथील जागृती केसरीनाथ राऊत ही 38 वयाची महिला कणेर फाटा येथील कंपनीत कामाला शुक्रवारी गेली होती. नेहमी ती सायंकाळी सहा साडेसहा दरम्यान घरी येत होती. मात्र वेळेवर न आल्याने तिचा शोध सुरू केला.

नातेवाईकांना फोन केले, मात्र काहीही माहिती न मिळाल्याने ती येणाऱ्या रस्त्यावर तिचा शोध घेण्यात आला. यावेळी राऊत पाडा येथील जवळच असलेल्या विहिरीत रात्री अकराच्या सुमारास मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे राऊत कुटुंबाला धक्का बसला आहे. (Crime News)

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीजवळ जेवणाचा डब्बा, चप्पल, बॅग मिळून आले. मात्र मोबाईल मिळून आला नाही. मृत महिला जागृती हिला दोन मुली असून एक बारावी व एक सातवीमध्ये शिक्षण घेत आहेत, तर पतीही कंपनीत कामाला आहेत. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT