Virar News Saam Tv
मुंबई/पुणे

Virar Building Collapse : ती रात्र ठरली काळरात्र! विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच

Virar News : विरारमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी आहेत. एनडीआरएफ व अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • विरारमधील रमाबाई अपार्टमेंटचा चौथा मजला कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू, ९ जखमी

  • वीस तासांपासून एनडीआरएफ व अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

  • साने बिल्डर अटकेत, धोकादायक इमारतींवर कारवाईचा इशारा

  • नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर, परिसरात भीतीचं वातावरण

विरारमधील नारंगी फाटा परिसरात असलेली रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची ४ मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली असून वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. आतपर्यंत बचावकार्य दरम्यान १७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ९ जण जखमी सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री विरार येथील विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे. ही इमारत १० वर्ष जुनी असून या इमारतीचं शासनाकडून ऑडिट करण्यात आले नव्हते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच एन.डी.आर.एफ. टिम आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाच्या टिमने तातडीने बचावकार्य सुरु करून काल ढिगाऱ्याखाली अडकलेले ३ मृतदेह बाहेर काढले. आज मृतांचा आकडा वाढून १७ वर गेला असून ९ जण जखमी आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेबाबत वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त म्हणाले, "या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात येणार आहे. तसेच जे जखमी आहेत त्यांच्या उपचाराकडे आमचे लक्ष आहे. ज्या बिल्डरने ही बिल्डिंग बांधलेली त्या साने बिल्डरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई विरार शहरात ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. त्यांना कोणतीही दया मया दाखवली जाणार नाही. रमाबाई अपार्टमेंट मधील घरमालकांना या जमिनीमध्ये भोगवट प्रमाणपत्र दिले जाईल यामुळे बिल्डर दुसऱ्या कोणालाही जागा विकू शकणार नाही." असे त्यांनी म्हटले.

दरम्यान या घटनेनंतर अद्यापही बचावकार्य सुरु आहे. अजूनही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला ही शुभ वस्तू नक्की खरेदी करा, दारिद्र्य होईल दूर

SCROLL FOR NEXT