Scene of the deadly ST bus and rickshaw collision in Virar, which claimed one life and left several others injured. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Accident : शिर्डीकडे जाणाऱ्या बसने रिक्षाला उडवले, महिलेचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Virar Accident: विरारमध्ये एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; ५५ वर्षीय महिला ठार, पाच जण जखमी. रिक्षाचालक पूनम वरठे आणि अन्य महिला प्रवासी गंभीर जखमी. चालक फरार, पोलीस शोध घेत आहेत.

Namdeo Kumbhar

Virar Arnala ST bus and rickshaw accident latest update : विरारमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झालाय. अर्नाळा एसटी बस स्थानकामधून निघालेल्या बसने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. तीन जणांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. आज सकाळी ९ वाजता हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये मृत झालेल्या महिलेचे नाव कविता नितीन कोलगे असं आहे. तर महिलारिक्षा चालक पूनम वरठे आणि प्रवाशी महिला कल्पना पाटील, ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दिनेश जैस्वाल, सोनू खान हे किरकोळ जखमी आहेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा लक्ष्मण रोड सोसायटीजवळ शिर्डीकडे जाणारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यात जोरदार अपघात झाला. या अपघातात कविता कोलगे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. आगाशीहून अर्नाळ्याकडे जाणारी रिक्षा चालक पूनम वरठा यांच्या रिक्षेत प्रवासी कविता नितीन कोलगे (वय ५५, रा. जुना कोळीवाडा), मीनाक्षी योगेश पाटील (रा. विरार पूर्व) आणि शिल्पा राऊत हे प्रवास करत होते. याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अर्नाळा-शिर्डी एसटी बसने (चालक: राजू शंकर गांगुरडे, रा. मनमाड) रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत कविता कोलगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मीनाक्षी पाटील यांचा पाय तुटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने विरार येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर बसचालक राजू गांगुरडे घटनास्थळावरून फरार झाला आहे. अर्नाळा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रिक्षाचालक पूनम वरठा यांच्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे, तर जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुरंदर विमानतळाच्या जागा हस्तांतरण मार्ग मोकळा

Mumbra Railway Station : 'मुंब्रा' स्टेशनचे नाव अज्ञाताने अचानक बदलले, स्टेशनच्या फलकावर लावले दुसरे नाव

छगन भुजबळांचा कौतुकास्पद निर्णय, शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श

Parbhani Heavy Rain : परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; शेताला आले नदीचे स्वरूप, होत्याचं नव्हतं झाले

Korigad Fort History: ट्रेकिंग, निसर्ग आणि युद्धनीती; कोरीगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT