Mumbai Kandivali Western Express Highway Bus Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईत धावत्या बसने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली, पहा VIDEO

Mumbai Kandivali Western Express Highway Bus Fire : मुंबईतील कांदिवली येथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या खासगी बसला भीषण आग लागली. मेट्रो लाईन ७ च्या पुलाखाली घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Alisha Khedekar

  • कांदिवलीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला आग

  • मेट्रो लाईन ७ च्या पुलाखाली घडली घटना

  • आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली घटना

  • बस पूर्णतः जळून खाक, व्हिडिओ व्हायरल

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

संजय गडदे,मुंबई

Mumbai Western Express Highway Private Bus Fire मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो लाईन ७, रेड लाईनच्या पुलाखाली आज सकाळी १०:०१ वाजता ही घटना घडली. बस आगीत जळून खाक झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या झपाट्याने व्हायरल होत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मुंबईतील मालाड पूर्वेकडील बोरिवलीकडे जाणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया ब्रिजजवळ आज सकाळी एका खासगी बसला आग लागली. आग लागल्यानंतर बसने काही क्षणातच धगधगत पेट घेतला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. सर्व प्रवाशांना वेळेवर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची पुढील चौकशी अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. घटनेमुळे काही काळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु नंतर वाहतूक पोलिसांनी ती व्यवस्थापित केली. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, मेट्रो पुलाखाली पिवळी बस जळताना दिसत आहे. गाडी जळत असताना त्यातून दाट काळा धूर निघताना दिसत आहे. कोणताही अपघात टाळण्यासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक हळूहळू आणि काळजीपूर्वक चालताना दिसत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस आणि इतर अधिकारी वाहतूक व्यवस्था नियंत्रित करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे नगरसेवक काँग्रेस नगरसेवकांच्या संपर्कात? मुनगंटीवारांनी घेतली फिरकी

Tikli Design: टिकलीचे 5 स्टायलिश प्रकार, कोणत्याही साडीवर भारीच दिसेल

Devmanus: इन्स्पेक्टर जामकर गोपाळला आर्याच्या मृतदेहासह रंगेहाथ पकडणार? 'देवमाणूस' मालिकेत येणार धक्कादायक ट्विस्ट

वाळू तस्कराच्या रिलने भांडं फुटलं, प्रशासन अॅक्शन मोडवर; थेट कायद्याचा बडगा उगारला

Viral Video : अंगाला स्पर्श केल्याचा इन्फ्लुएन्सरचा आरोप, व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरुण नैराश्यात, घाबरून आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT