नागिन ७ सीझन प्रमोशनसाठी मुंबई मेट्रो ट्रेन नागीण थीममध्ये सजवली
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नेटकरांनी “नागलोकहून येणारी ट्रेन” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली.
नागिणचा प्रीमियर २७ डिसेंबरला झाला
मुंबईतील लोकलमध्ये, बसमध्ये आपण अनेकदा प्रमोशनल पोस्टर किंवा लोकलमधील टीव्हीवर आपण एखाद्या चित्रपटाची झलक पाहतो. त्याचप्रमाणे मुंबई मेट्रोवर नागीणने कब्जा केला आहे. या लोकलचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, नागिनचा नवीन सीझन अखेर आला आहे. हा शो पहिल्यांदा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि २०२५ मध्ये नागीण ७ हा एक नवीन सीझनसह परतला आहे. यावेळी एकता कपूरने प्रमोशनसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. ज्यामुळे प्रवासी आणि नेटकरी दोघेही थक्क झाले आहेत.
एकता कपूरच्या सुपरहिट टीव्ही शो नागिन ७ च्या प्रमोशनसाठी, संपूर्ण मुंबई मेट्रो ट्रेन शोच्या थीमनुसार सजवण्यात आली होती. घाटकोपर ते वर्सोवा पर्यंत धावणारी ही ट्रेन हिरव्या रंगाच्या छटांमध्ये डिझाइन करण्यात आली होती, जी दूरवरून एका महाकाय सापासारखी दिसत होती. नागिन ७ चा लोगो ट्रेनच्या पुढील भागावर, डब्यांवर आणि दरवाज्यावर सजवण्यात आला होता.
रोजच्या प्रवासात मेट्रो पकडण्यासाठी घाई करणाऱ्या प्रवाशांसाठी हे दृश्य एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी नव्हते. प्लॅटफॉर्मवरील लोक ट्रेनमध्ये चढताच, सर्वत्र नागिन ७ चे पोस्टर्स पाहून त्यांना धक्का बसला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी याला "नागलोकहून येणारी ट्रेन" म्हटले, तर काहींनी म्हटले आहे कि, "बघताच क्षणी ते अॅनाकोंडासारखे वाटले."
नागिन ७ चा प्रीमियर २७ डिसेंबर रोजी झाला. या सीझनमध्ये प्रियांका चहर चौधरी आणि नमिक पॉल यांच्यासोबत ईशा सिंग, एलिस कौशिक आणि करण कुंद्रा मुख्य भूमिकेत आहेत. या कथेत एका धोकादायक अजगराशी होणारा सामना दाखवण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढेल. मुंबई मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अशा प्रकारे वापर करणे ही टीव्ही प्रमोशनसाठी एक नवीन आणि प्रभावी पद्धत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.