MUMBAI HOTEL COOK CAUGHT SPITTING ON ROTIS BEFORE SERVING CUSTOMERS Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : रोटीवरच थुंकला कुक, मुंबईतील नामंकित हॉटेलमधील धक्कादायक घटना, Video व्हायरल

Mumbai Goregaon News : मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील एका हॉटेलमध्ये रोटीवर थुंकून ग्राहकांना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालक आणि कुकविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • गोरेगावातील हॉटेलमध्ये रोटीवर थुंकून ग्राहकांना दिल्याचा आरोप

  • संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

  • दिडोंशी पोलिसांनी हॉटेल मालक आणि कुकविरोधात गुन्हा दाखल केला

  • स्थानिक नागरिकांनी संबंधित हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी केली

संजय गडदे, मुंबई

गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये रोटी बनविताना प्रत्येक रोटीवर थुंकून ती ग्राहकांना दिली जात असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिडोंशी पोलिसांनी हॉटेल मालक फैय्याज अहमद शेख आणि कुक कौशार गफार शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर दोघांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली.

दिपक दत्ताराम पवार (Dipak Dattaram Pawar) हे गोरेगाव येथील संतोषनगर बीएमसी कॉलनीत (Santosh Nagar BMC Colony) आपल्या वयोवृद्ध वडिलांसोबत राहतात. घरी स्वयंपाकासाठी कोणी नसल्याने ते नेहमी बाहेर हॉटेलमध्ये जेवण करतात. २३ मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. मात्र तेथे गर्दी असल्याने ते दुसऱ्या हॉटेलकडे निघाले. यावेळी संतोषनगरमधील “फिश कोळीवाडा” (Fish Koliwada Hotel) हॉटेलजवळून जात असताना त्यांना हॉटेलमधील कुक रोटीवर थुंकताना दिसला. संशय आल्याने त्यांनी काही वेळ थांबून निरीक्षण केले असता संबंधित कुक प्रत्येक रोटीवर थुंकून ती भट्टीत टाकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तीच रोटी ग्राहकांना दिली जात असल्याचेही त्यांनी पाहिले.

हा संपूर्ण प्रकार त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला. संबंधित व्हिडीओ स्थानिक नागरिकांना दाखविल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. प्रकरणाची गंभीर दखल घेत दिपक पवार यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर दिडोंशी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हॉटेल मालक फैय्याज शेख आणि कुक कौशार शेख यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

पोलिस तपासात कौशार शेख हा उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले. तो गेल्या काही महिन्यांपासून संबंधित हॉटेलमध्ये रोटी बनविण्याचे काम करत होता. ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, याची जाणीव असूनही तो रोटीवर थुंकून त्या ग्राहकांना देत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 271, 275 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

ज्ञानेश कुमारांकडून भाजपच्या तिकीटाची ऑफर; केरळच्या माजी सचिवांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT