Viral Video  Saam tv
मुंबई/पुणे

Viral Video : 'भिमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं...'; ट्रेनमध्ये तरुणांनी गायलेलं गाणं तुफान व्हायरल

ट्रेनमध्ये तरुणांनी गायलेलं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईची लोकल ट्रेन म्हटलं तर डोळ्यासमोर प्रचंड गर्दीच उभी राहते. लोकल ट्रेनच्या डब्ब्यातून हजारो नोकरी करणारे प्रवासी ये-जा करत असतात. बहुतांश प्रवासी लोकल ट्रेनच्या गर्दीत घामाघूम होत उभं राहून प्रवास करत असतात. तर ट्रेनमध्ये सीटवर बसलेले प्रवासी मोबाईलमध्येच गुंतलेले असतात. मात्र, या लोकल ट्रेनमध्ये आनंदात गाणं गात प्रवास करणारे प्रवासी क्वचित आढळून येतात. असाच लोकल ट्रेनमध्ये गाणं गात प्रवास करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ समोर आला आहे. ट्रेनमध्ये तरुणांनी गायलेलं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये (Local Train) बहुतांश वयोस्कर प्रवासी भजन गात प्रवास करतात. तर क्वचित एखादा वयोस्कर व्यक्ती गाणं गाताना दिसतो. त्यामुळे असे व्यक्ती गोड गळ्याने गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन करतात. अशावेळी प्रवास करणारे देखील दहा ते पंधरा मिनिटं त्याच्याकडे लक्ष देतात. त्यामुळे प्रवासी व्यक्तीचा प्रवास कसा पूर्ण होतो कळतच नाही.

लोकल ट्रेनमध्ये सायंकाळी घरी परतताना एखाद्या व्यक्तीचे गाणे कानी पडल्यास दिवसभराची मरगळही दूर होते. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये गाणे गाणारे व्यक्ती सर्व प्रवाश्यांचे हमखास लक्ष वेधून घेतात. हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात ट्रेनमध्ये गाणे गाणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी हातात माईक व मोठा स्पीकर घेऊन लोकल ट्रेनमध्ये गाणं गाणाऱ्या महिला प्रवासीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेचे नेटकऱ्यांनी भरपूर कौतुक केलं होतं. त्यानंतर आता लोकल ट्रेनमध्ये तरुणांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या तरुणांनी 'भिमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं...' या आशयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्यावरील आधारित गाणं गायलं आहे.

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातील हे गाणं तरुणमंडळी आवडीने गाताना दिसत आहे. लोकल ट्रेनमध्ये तरुणांनी गायलेलं गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. तरुणांचं व्हायरलं गाणं नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. बहुतांश नेटकरी हे गाणं आवडीने शेअर करताना दिसत आहे. हे व्हायरल गाणं (Viral Song) आतापर्यंत लाखो जणांनी पाहिलं आहे. अनेक नेटकरी या तरुणांनी गायलेल्या गाण्यांचे कौतुक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: स्वप्नपूर्ती! अवघ्या २१ व्या वर्षी मिळवली अमेरिकेत २६ लाख पॅकेजची नोकरी; शेतकऱ्याच्या लेकाचा प्रवास वाचून डोळे पाणावतील

मध्य प्रदेशातील गुलाबी थंडी, गाव झोपेत अन् छापेमारीचा धडका, पुणे पोलिसांचे "ऑपरेशन उमरती" यशस्वी

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा,युरियासाठी शेतकऱ्यांच्या खत विक्री केंद्रावर रांगा

Mumbai Fire: झोपडपट्टीला भीषण आग, १५ झोपड्या जळून खाक|VIDEO

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT