Aurangabad : औरंगाबादेत चाललंय काय? पोलिसांचा पुन्हा दारूच्या नशेत राडा; महिलांना शिवीगाळ केल्याचा Video Viral

औरंगाबादेत पीएसआयने दारुच्या नशेत महिलेसोबत विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
Aurangabad News
Aurangabad News Saam Tv
Published On

Aurangbad News : पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एससीपी विनयभंग प्रकरण ताजे असताना आणखी प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद पोलिसांचा पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत कारनामा समोर आला आहे. औरंगाबादेत पीएसआयने दारुच्या नशेत महिलेसोबत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. महिलांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेत पोलीस अधिकाऱ्याने दारुच्या नशेत महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीएसआय अनिल बोडले असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलीस अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर महिलाच चांगल्याच संतापल्या.अनिल बोडले यांनी मद्यधुंद अवस्थेत कॉलनीतील महिलांना अश्लील शिवीगाळ केली. अनिल बोडले यांचा दारुच्या नशेत महिलांना (Women) अश्लील शिवीगाळ करताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Aurangabad News
Navi Mumbai Crime : उरणमध्ये १४ वर्षीय मुलाचा ५ वर्षीय मुलीवर बलात्कार; पीडितेने आईला सांगितल्यावर बसला मोठा धक्का

पोलीस अधिकारी अनिल बोडले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. या महिलांनी मध्यरात्रीपर्यंत जवाहर नगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यामुळे जवाहर नगर पोलिसांना ठाण्यातील पोलिसांना कारवाई करावी लागली. या घटनेनंतर पीएसआय अनिल बोडले यांना जवाहर नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलीस अधिकारी बोडले यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.

विशाल ढुमे यांच्यावर झाली होती निलंबनाची कारवाई

औरंगाबाद पोलीस (Aurangabad Police) दलातील विशाल ढुमे हे नाईट ड्युटीवर असतांना या पोलीस अधिकाऱ्याने रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार केला होता. महिलेच्या छेडछाड आणि विनयभंग प्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Aurangabad News
Mumbai Crime News: सोन्याच्या कारखान्यात कामगारांकडून हेराफेरी; लाखोंचा मुद्देमाल लंपास

गृह विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली होती. विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com